Tech Tips: तुमच्याही iPhone मध्ये सतत स्टोरेजची समस्या येतेय? आत्ताच फॉलो करा या सोप्या टीप्स
स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे आयफोनचा लूक आणि सिक्योरिटी फीचर्स. खरं तर याशिवाय अनेक स्मार्टफोन्सच्या तुलनेत आयफोनची कॅमेरा क्वालिटी कमाल आहे. आयफोनची किंमत जरी जास्त असली तरी देखील लोकांमध्ये या फोनची क्रेझ मात्र कमी होत नाही. आयफोनसाठी लोकं दिवाने आहेत, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. स्मार्टफोनची क्रेझ एवढी प्रचंड असली तरी देखील सर्व स्मार्टफोन युजर्समध्ये एक गोष्ट सामान्य असते. ती म्हणजे आयफोनच्या बॅटरी आणि स्टोरेजची समस्या.
असे अनेक स्मार्टफोन युजर्स आहेत, ते स्मार्टफोनच्या बॅटरी आणि स्टोरेजच्या समस्येने वैतागले आहेत. खरं तर आजकाल आयफोनवर स्टोरेज समस्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. काही काळानंतर, प्रत्येक युजरला स्टोरेजची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत, आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे डेटा डिलीट करणे किंवा स्टोरेज खरेदी करणे. काही लोक या समस्येने इतके त्रस्त होतात की ते नवीन फोन घेण्याचा विचारही करू लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या या समस्येवर काही सोपे उपाय देखील आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोनचं स्टोरेज मोकळे करू शकता आणि यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग सेट करायची आहे आणि तुमचे स्टोरेज मोकळे करायचे आहे. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
वरील स्टेप्स फॉलो केल्यानंतर, शेवटी तुमचा फोन बंद करा आणि काही मिनिटांनी तो पुन्हा चालू करा. आता फोन सेटिंग्जमधील स्टोरेजमध्ये जा आणि ते रिफ्रेश करा. तुमच्या फोनमध्ये किती स्टोरेज मोकळे आहे यात बदल तुम्हाला येथे दिसेल. या प्रक्रियेचा वापर करून तुम्ही 10GB पर्यंत स्टोरेज मोकळे करू शकता.