BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या रिचार्ज प्लॅन्सने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचं कारण म्हणजे खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स. BSNL ने आतापर्यंत त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर केले आहेत. BSNL च्या या रिचार्ज प्लॅन्सची विशेषता म्हणजे त्यांची कमी किंमत आणि जास्त फायदे. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक प्लॅन सुरु केला आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाते आणि तीही परवडणाऱ्या किंमतीत.
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. कंपनीच्या या 365 दिवसांची व्हॅलिडीटी देणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 1515 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. इतर कंपन्यांच्या तुलनेत संपूर्ण वर्षाच्या व्हॅलिडीटसह येणारा हा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. चला तर मग आता कंपनीच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL च्या 1515 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. या योजनेची सर्विस व्हॅलिडीटी 365 दिवस आहे. खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन डेटा व्हाउचर आहे, त्यामुळे त्यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस बेनिफिट्स किंवा सर्विस व्हॅलिटीडी समाविष्ट नाही. ज्यांनी बीएसएनएलचा दीर्घकालीन प्लॅन रिचार्ज केला आहे त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम डेटा व्हाउचरपैकी एक आहे.
हे बीएसएनएलचे सर्वात महागडे डेटा व्हाउचर आहे. यानंतर, 411 रुपयांचा प्लॅन हा दुसरा सर्वात महागडा डेटा व्हाउचर आहे, जो 90 दिवसांच्या व्हॅलिडीटसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देखील मिळतो. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. त्याच वेळी, 198 रुपयांच्या योजनेची व्हॅलिडीटी 40 दिवसांची आहे आणि त्यात दररोज 2GB डेटा देखील मिळतो.
या सर्व डेटा व्हाउचरसह तुम्हाला बेस अॅक्टिव्ह प्रीपेड प्लॅनची आवश्यकता आहे. यामध्ये सर्विस व्हॅलिटीडी समाविष्ट नाही. या व्हाउचर्सची स्वतंत्र व्हॅलिटीडी आहे आणि ती फक्त सक्रिय सर्विस व्हॅलिटीडी योजनेसहच काम करतात. बीएसएनएलकडे अधिक परवडणारे डेटा व्हाउचर देखील आहेत, जे तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर तपासू शकता.
भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय
कंपनीकडे असे अनेक प्लॅन आहेत जे सेकंडरी सिमसाठी देखील चांगले आहेत. हे प्लॅन मर्यादित कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह दीर्घ सेवा वैधता देतात. कंपनी सध्या तिचे 4G नेटवर्क वाढवण्यावर काम करत आहे. जून 2025 पर्यंत 1 लाख 4G टॉवर्सचा टप्पा गाठण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांनी केलेल्या दरवाढीनंतर, बीएसएनएल हा देशातील सर्वात परवडणारा पर्याय बनला आहे.