
Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणपती आणि नवरात्री हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सणासुदीच्या दिवशी रेशन दुकानातून स्वस्त धान्य दिले जाते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केलेला आनंदाचा शिधा देखील रेशनकार्ड धारकांना दिला जातो. त्यासाठी तुमचं रेशनकार्ड सुरु असणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच नागरिकांना आपले रेशनकार्ड सुरु आहे की, बंद पडलयं हे माहिती नसते. त्यामुळे रेशन घेण्यावेळी त्यांना होल्डवर टाकलं आहे. आता अन्न पुरवठा विभागाने सांगितले की, कार्ड पुन्हा सुरु करायचे झाले e-KYC करावी लागणार आहे. यासाठी कुठे जायची गरज राहिली नाही. आता घरी बसल्या तुम्ही रेशनकार्डची KYC करु शकता. कसं जाणून घ्या हा पूर्ण लेख… Ration Card e-KYC:
आता पुर्वी सारखे राहिले नाही, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि मशीनवर झाली असल्याने रेशींन दुकानावर PoS मशीन बसवले त्यावर अंगठा द्यावा लागतो. एखादा व्यक्ती जर सलग
महिने धान्य घेत नसेल , तर सरकारी सिस्ट त्याला कुटुंबाला गरज नाही किंवा ते इथे राहत नाहीत असे समजते. मग त्या व्यक्तीचे कार्ड आपोआप In-active लिस्टमध्ये टाकलं जातं.
दुसरं कारण म्हणजे आधारकार्ड लिंकिंग. घरातल्या सगळ्या माणसांचं आधार कार्ड रेशन कार्डला जोडलेलं नसेल किंवा e-kyc झाली नसेल तर ते कार्ड तात्पुरत बंद करण्यात येत. कारण त्यामुळे गैरव्यवहार थांबतात
दुसरा मार्ग – AePDS पोर्टल. हे पण महाराष्ट्रासाठी आहे. यावर जाऊन RC Details मध्ये जा. तिथे तुमच्या कुटुंबातील सगळ्या लोकांचे आधार नंबर बरोबर आहेत का, बँक अकाऊंट लिंक आहे का हे तपासता येतं. जर काही चुकलं असेल तर तिथेच दुरुस्त करता येतं.
तिसरा मार्ग – जर मोबाईलवर जमत नसेल तर सरळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा CSC सेंटरवर जा. तिथे फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा. ते तुमचा अंगठा घेऊन लगेच सिस्टममध्ये KYC करून देतात. 5 मिनिटाचं काम आहे.
समजा तुम्ही साईटवर चेक केलं आणि तिथे ‘Deleted’ किंवा कायमचं रद्द दाखवत असेल, तर मग KYC करून फायदा नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. MahaFood साईटवरून Form 14 डाउनलोड करा आणि तो भरून ऑनलाईन सबमिट करा.एकदा का तुम्ही KYC केली की लगेच कार्ड चालू होत नाही. सिस्टमला डेटा अपडेट करायला 24 ते 48 तास लागतात. त्यामुळे सणाच्या ऐन दिवशी करू नका, आत्ताच दोन दिवस आधी करून ठेवा, म्हणजे सणाला धान्य आणि आनंदाचा शिधा दोन्ही वेळेवर मिळेल.
छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! Amazon Pay-Kotak चे खास क्रेडिट कार्ड लॉन्च