Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
तुम्हाला देखील कधी Instagram रिलचा ऑडिओ स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून सेट करावासा वाटलं आहे का? पण याची प्रोसेस नक्की काय आहे, याबाबत अनेकांना माहिती नसतं. आयफोन आणि अँड्रॉईड दोन्ही यूजर्ससाठी ही प्रोसेस अतिशय सोपी आहे.
Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनची रिंगटोन कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
Follow Us
Follow Us:
रिलचा ऑडिओ आपल्या स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून कशी सेट करायची?
अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी प्रोसेस अतिशय सोपी
प्रोसेस फॉलो करण्यासाठी आयओएस 26 असणं गरजेचे
InstagramTips: अनेकदा असं घडतं की, आपण इंस्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करत असतो आणि अचानक आपल्याला एखादे गाणे किंवा म्युझिक इतके आवडते की वारंवार ऐकण्याची इच्छा होते. काही लोकं तर हे गाणे किंवा म्युझिक आपली रिंगटोन म्हणून देखील सेट करतात. पण रिलचा ऑडिओ आपल्या स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून कशी सेट करायची याबाबत अनेकांना माहिती नसतं. पण खरं तर अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी ही प्रोसेस अतिशय सोपी आहे. आयओएस 26 मुळे ही प्रोसेस आणखी सोपी झाली आहे. जर तुमच्याकडे आयओएस 26 असलेला आयफोन असेल तर तुम्ही 30 सेकेंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीची एमपी3 किंवा एम4ए ऑडियो फाईल थेट रिंगटोन म्हणून सेट करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
तुम्हाला ज्या रिलचा ऑडिओ स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून सेट करायचा आहे, सर्वात आधी ती रिल आयफोनमध्ये डाऊनलोड करा.
आता व्हिडीओ ट्रिम करा आणि केवळ तेवढाच भाग ठेवा जो तुम्हाला रिंगटोन म्हणून सेट करायचा आहे. आयफोनवर थेट रिंगटोन सेट करण्यासाठी ऑडिओ फाईल 30 सेकंद किंवा त्याहून कमी असणं गरजेचं आहे.
लक्षात ठेवा की, ही प्रोसेस फॉलो करण्यासाठी तुमच्याकडे आयओएस 26 असणं गरजेचे आहे. ॲपलने आयओएस 26 मध्ये फाईल्स ॲपद्वारे शॉर्ट ऑडिओ फाईल थेट रिंगटोन बनवण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.
आता सर्वात आधी व्हिडीओ फाईल्समध्ये सेव्ह करा. यानंतर व्हिडीओमधून ऑडिओ फाईल तयार करा. कारण व्हिडीओ थेट रिंगटोन म्हणून सेट केला जाऊ शकत नाही.
आता व्हिडीओमधील ऑडिओ MP3 किंवा M4A फॉर्मेटमध्ये सेव्ह करा. यानंतर फाईलची लांबी 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
आता आयफोनमध्ये फाईल्स ॲप ओपन करा आणि त्याच्या फोल्डमध्ये जा, जिथे तुम्ही ऑडिओ फाईल सेव्ह केली आहे. ऑडिओ फाईलवर लाँग प्रेस करा आणि शेअर पर्याय निवडा.
आता यूज ॲज रिंगटोन पर्याय निवडा. हा पर्याय तुम्हाला शेअर मेन्यूमध्ये दिसेल. आता या पर्यायावर टॅप करा. यानंतर तुम्ही सेव्ह केलेला ऑडिओ आयफोनची रिंगटोन म्हणून सेट केला जाणार आहे.
जर तुम्हाला शेअर मेन्यूवर क्लिक केल्यानंतर हा पर्याय दिसत नसेल तर शेअर मेन्यूमधील मोअर पर्यायावर टॅप करा. यानंतर, ‘सेटिंग’ मधील ‘साउंड अँड हॅपटिक्स’ मध्ये जा आणि ‘रिंगटोन’ वर क्लिक करा; येथे तुम्ही रिंगटोन पाहू आणि निवडू शकता.
सर्वात आधी अँड्रॉईड स्मार्टफोनवर इंस्टाग्राम रिल ओपन करा आणि त्याची लिंक कॉपी करा.
आता इंटरनेटवरील इंस्टाग्राम व्हिडीओ ऑडिओमध्ये बदलण्याचे उपलब्ध असलेले टूल शोधा आणि तिथे रिलची लिंक पेस्ट करा. यानंतर ऑडिओ वर्जन डाऊनलोड करा.
ऑडिओ डाऊनलोड झाल्यानंतर फोनच्या फाईल्स ॲपमध्ये जा आण डाऊनलोड फोल्डर ओपन करा.
डाऊनलोड करण्यात आलेली ऑडिओ फाईल कॉपी करा आणि फोनच्या रिंगटोन फोल्डरमध्ये पेस्ट करा.
आता फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन रिंगटोन बदलण्याचा पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेल्या ऑडिओ फाईल्स दिसणार आहेत. ही फाईल निवडताच इंस्टाग्रामचा रिलचा ऑडिओ स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून सेट केला जाणार आहे.
Web Title: How to set instagram reel audio as smartphone ringtone here are some easy steps for iphone and android users