Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स... जाणून घ्या सविस्तर
नथिंग फोन (4a) च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर नथिंग फोन (4b) च्या नव्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. नथिंग फोन (4b) 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 39,999 रुपये आणि 40,999 रुपये आहे. नथिंग फोन (4a) स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये देखील उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. फोन (4a) पिंक कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
नथिंग फोन (4a) आणि फोन (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. दोन्ही फोन ड्यूअल सिम कनेक्टिविटीसह येतो, जो अँड्रॉईड 16 वर आधारित नथिंग ओएस 4.1 वर चालतो. नथिंगच्या फोन (4a) मध्ये 6.78-इंच (1,224 x 2,720 पिक्सेल) एलटीपीएस फ्लेक्सीबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्सची आहे. हा फोनच्या डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट 2,500Hz पर्यंत आहे आणि हा कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो.
नथिंग फोन (4a) स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 5,400mAh बॅटरी दिली आहे. नथिंग फोन (4b) बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6,000mAh बॅटरी, 6.77-इंच का फुल-एचडी+ (1,080 x 2,344 पिक्सेल) सॅमसंग सुपर अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट मिळणार आहे.






