पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
UIDAI ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नॅशनल डेटा हॅकाथनची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल डेटा हॅकाथनमध्ये सहभागी होणाऱ्या तंत्रज्ञानप्रेमी तरुणांना आधार कार्डसाठी डेटा-ड्रिवन सूचना द्याव्या लागतील. यामध्ये आधार कार्ड सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतींपासून ते याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याबाबत अनेक पावलं उचलली जाणार आहेत. जर सरकारी संस्थेला सहभागींच्या सूचना आवडल्या तर त्यांना रोख बक्षीसासह प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. यासाठी सर्वात आधी रजिस्टर करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेबाबत सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Participate in the National Data Hackathon to generate data-driven insights on Aadhaar. The top 5 innovative submissions will receive cash awards and certificates:
1st prize: Rs. 2,00,000/-
2nd prize: Rs. 1,50,000/-
3rd prize: Rs. 75,000/-
4th prize: Rs.… pic.twitter.com/EEjurRznV1 — Aadhaar (@UIDAI) January 2, 2026
सरकारी एजेंसीने नॅशनल डेटा हॅकाथनसाठी 5 इनोवेटिव कल्पनांना 5 लाख रुपयांचे बक्षीस आणि सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली आहे.
नॅशनल डेटा हॅकाथनसाठी 5 जानेवारी 2026 पासून रजिस्ट्रेशन सुरु केले जाणार आहे. यूजर्स 5 जानेवारीपासून 20 जानेवारी 2026 दरम्यान त्यांच्या कल्पना एजेंसीला शेअर करू शकतात. यासाठी यूजर्सना आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे किंवा event.data.gov.in वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईटवर तुमचं नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून तुमची कल्पना सबमिट करा. एजन्सीने सादर केलेल्या कल्पनांपैकी, 5 सर्वोत्तम कल्पनांना बक्षीस रक्कम दिली जाईल.






