
HP ZBook Ultra G3a (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कंपनीने या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 2,89,990 रुपये ठेवली आहे, हे कर वगळून आहे. म्हणजे प्रत्यक्षात याची किंमत 3 लाखाच्या पुढेच जाणार. हा लॅपटॉप तुम्हाला Amazon किंवा Flipkart वर नाही मिळणार नसून HP च्या अधिकृत कमर्शियल पार्टनर्सकडे जावे लागेल, जे मोठ्या कंपन्यांना लॅपटॉप विकतात.
याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हा क्लाउड शिवाय AI मॉडेल चालवू शकतो. आजकाल मोठे AI मॉडेल चालवायला मोठ्या सर्व्हरची गरज लागते. पण HP म्हणते की या लॅपटॉपमध्ये तुम्ही थेट 300 बिलियन पॅरामीटर्स असलेले मोठे AI मॉडेल तुमच्याच लॅपटॉपवर चालवू शकता. बाहेरच्या सर्व्हरची गरज नाही.
यात AMD चा नवीन Ryzen AI Max+ PRO 495 प्रोसेसर लावला आहे. हा नॉर्मल प्रोसेसर नाहीये, AI साठी खास बनवला आहे. यात 192GB पर्यंत RAM लावता येते, जी एका लॅपटॉपसाठी खूपच जास्त आहे. आणि 160GB VRAM पण मिळते. त्यामुळे कितीही मोठी फाईल असो, 3D डिझाईन असो, सगळे एकदम स्मूथ चालते.यात NPU पण आहे जो 55 TOPS चा AI स्पीड देतो. म्हणजे AI ची कामे खूप वेगाने होतील.
यात 16 इंचाचा मोठा 2.8K OLED डिस्प्ले दिला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, त्यामुळे स्क्रीन एकदम क्लिअर आणि स्मूथ दिसते. कलर पण एकदम खरे वाटतात, जे क्रिएटर्ससाठी खूप महत्वाचे आहे.
एवढी पॉवर असून पण हा लॅपटॉप जाड नाही. याचे वजन फक्त 1.9 किलो आहे आणि जाडी फक्त 17.9mm आहे. सहज बॅगेत घेऊन फिरता येईल. कंपनीने याचे कूलिंग सिस्टम पण नवीन बनवले आहे, जे जुन्या मॉडेलपेक्षा 81.8% जास्त चांगले काम करते. त्यामुळे 100W वर सतत काम केले तरी लॅपटॉप गरम होत नाही किंवा आवाज करत नाही.
यात 96Wh ची मोठी बॅटरी आहे. कंपनी म्हणते की एकदा चार्ज केल्यावर 14 तास चालेल. हे खरे असेल तर या पॉवरच्या लॅपटॉपसाठी खूप चांगले आहे. यासोबत 140W आणि 180W चे दोन फास्ट चार्जर मिळतात, दोन्ही USB-C वाले.यात 5G चा ऑप्शन पण आहे, म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरी सिम टाकून हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकता.
OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर
सुरक्षेसाठी HP Wolf Security दिली आहे, जी तुमचा डेटा सुरक्षित ठेवते.कोणासाठी आहे हा लॅपटॉप?हा लॅपटॉप कॉलेजच्या मुलांसाठी किंवा ऑफिसच्या साध्या कामासाठी नाहीये. ज्यांना रोज AI मॉडेल ट्रेन करायचे आहेत, मोठे कोडिंग करायचे आहे, 4K व्हिडिओ एडिटिंग किंवा 3D मॉडेलिंग करायचे आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. किंमत जास्त वाटत असली तरी या लेव्हलच्या कामासाठी हा एक छोटा सुपर-कॉम्प्युटरच आहे असे म्हणायला हरकत नाही.
Ans: सुरुवातीची किंमत ₹2,89,990 असून कर अतिरिक्त आहेत.
Ans: AMD Ryzen AI Max+ PRO 495.
Ans: AI तज्ज्ञ, इंजिनिअर्स, कोडर्स, डिझायनर्स आणि व्हिडिओ एडिटर्ससाठी.