
भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ( TRAI ) च्या नवीन रिपोर्टनुसार, देशातील 4 प्रमुख DTH ऑपरेटर्सच्या ग्राहक संख्येत 13.4 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. एका वर्षापूर्वी यांची ग्राहक संख्या सुमारे 5.6 करोडडहून अधिक होती. मात्र 30 जून 2026 पर्यंत ही संख्या सुमारे 4.85 करोडपर्यंत कमी झाली आहे. संख्येतील घट अजूनही सुरुच आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
सध्याच्या डिजीटल काळात DTH कनेक्शनमध्ये घट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजेच स्वस्त हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सची वाढती लोकप्रियता. आजच्या काळात लोकं त्यांच्या आवडीनुसार कधीही आणि कुठूनही कंटेट पाहणं पसंत करतात. मात्र DTH कनेक्शनमध्ये तुम्हाला ठरावीक वेळीच ठरावीक शो पाहावा लागतो. याशिवाय, स्मार्ट टिव्ही आणि स्मार्ट स्टिकमुळे लोकं थेट इंटरनेट आधारित IPTV आणि स्मार्ट ॲप पॅकेजच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ज्याची किंमत DTH रिचार्जच्या तुलनेत अधिक बजेट फ्रेंडली आहे. केवळ मोफत चॅनेल्स पाहण्यासाठी लोकं DD फ्री डिशवर शिफ्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे DTH ग्राहकांची संख्या कमी होत आहे.
शेअर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, टाटा प्ले 1.48 करोड़ सब्सक्राइबर्ससह सर्वात मोठे ऑपरेटर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर भारती टेलीमीडिया 1.35 करोड सब्सक्राइबर्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, सन डायरेक्ट 1.09 करोड सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या स्थानी आणि डिश टीवी इंडिया 2 लाख 10 हजार सब्सक्राइबर्ससह चौथ्या स्थानी आहे.
या आकड्यांमध्ये प्रसार भारतीची फ्री DTH सर्विस, DD फ्री डिशचे सब्सक्राइबर्स समाविष्ट नाहीत. टेलीविजन डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्मवरील निवडक ऑपरेटर्सनी 30 जूनपर्यंत 9.67 करोड ॲक्टिव सब्सक्राइबर्स असल्याची माहिती दिली. यामध्ये असे सब्सक्राइबर्स देखील समाविष्ट आहेत, जे 90 दिवसांपर्यंत इनॲक्टिव्ह होते किंवा असे यूजर्स ज्यांची सर्विस काही काळासाठी सस्पेंड करण्यात आली होती.
DTH चे 4.85 करोड सब्सक्राइबर्स होते. यानंतर केबल (मल्टी-सिस्टम ऑपरेटर्स किंवा MSOs) 3.72 करोडसह दुसऱ्या स्थानी होता. याशिवाय, इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (IPTV) चे 62.1 लाख सब्सक्राइबर्स होते. तर हेडएंड-इन-द-स्काई (HITS) ऑपरेटर्सचे 47.2 लाख सब्सक्राइबर्स असल्याची माहिती मिळाली आहे.
IPTV सेगमेंट म्हणजेच इंटरनेटद्वारे टिव्ही चॅनेल्स आणि व्हिडीओ कंटेट दाखवण्याच्या लिस्टमध्ये 40.9 लाख सब्सक्राइबर्ससह भारती एयरटेल पहिल्या स्थानी होते. यानंतर हैथवे डिजिटल 12.8 लाख यूजर्ससह दुसऱ्या स्थानी होते. हे लक्षात घेतले पाहिजे की, ही आकडेवारी सर्व कंपन्यांचा समावेश करत नाही, तर ती केवळ निवडक ऑपरेटरनी पुरवलेल्या माहितीवर आधारित आहे.