
१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
या ईअरबड्सची किंमत १,३९९ रुपये आहे. यामध्ये १,३९९ रुपये आहे. यामध्ये उत्तम साउंड आणि इमर्सिव्ह लिसनिंग अनुभव मिळणार आहे. या ईअरबड्समध्ये डॉल्बी ऑडिओ, ११ मिमी ड्रायव्हर्स, हायफाय डीएसपी कोअर आणि २४-बिट स्पेशियल ऑडिओ यांसारखे आकर्षक फीचर्स मिळणार आहे. कंपनीचे हे ईअरबड्स एकूण ४५ तासांपर्यंतचा प्लेबॅक ऑफर करतात. यामध्ये कॉलिंगसाठी एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह चार मायक्रोफोन्स, तर गेमिंगसाठी ४५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड मिळणार आहे. एएसएपी चार्ज फीचर केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार तासांपर्यंतचा प्लेबॅक ऑफर करते. या डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ ६.१, आयपीएक्स५ वॉटर रेझिस्टन्स, गुगल फास्ट पेअर, मल्टिपॉइंट कनेक्टिव्हिटी आणि इन-इअर डिटेक्शन यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
तुमचे बजेट १ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही बोट एअरडोप्स प्लस २२३ ईअरबड्स खरेदी करू शकता. या डिव्हाईसची किंमत ९९९ रुपये आहे. या ईअरबड्समध्ये ६० तासांपर्यंतचा प्लेबॅक, १३ मिमी ड्रायव्हर्स आणि अधिक प्रभावी ऑडिओ अनुभवासाठी बोट स्पेशल ऑडिओ देण्यात आला आहे. यूजर्सचा कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी यामध्ये एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह दोन मायक्रोफोन्स, तर गेमिंगसाठी ५५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड मिळणार आहे. ईअरबड्समधील एएसएपी चार्ज फीचर १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १५० मिनिटांपर्यंतचा प्लेबॅक ऑफर करणार आहे. यामध्ये ब्लूटूथ ६.०, आयपीएक्स४ वॉटर रेझिस्टन्स आणि मल्टी-कनेक्ट सपोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
दैनंदिन वापरासाठी तुम्ही बोट एअरडोप्स प्लस २२१ ईअरबड्सची निवड करू शकता. याची किंमत ९९९ रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये प्रीमियम लेदर-फिनिश केस, बोट स्पेशियल ऑडिओ आणि ६० तासांपर्यंतचा प्लेबॅक ऑफर केला जाणार आहे. यासोबतच यामध्ये १३ मिमी ड्रायव्हर्स, ब्लूटूथ ६.०, एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह दोन मायक्रोफोन्स आणि ५५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड मिळणार आहेत. ईअरबड्सचे एएसएपी चार्ज फीचर केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १५० मिनिटांपर्यंतचा प्लेबॅक ऑफर करते.
संगीत ऐकण्यासाठी आणि कॉलिंगसाठी नॉइज बड्स एन१ एक चांगला पर्याय ठरणार आहे. या ईअरबड्समध्ये ११ मिमी ड्रायव्हर्स आणि एकूण ४० तासांपर्यंतचा प्लेबॅक मिळणार आहे. याची किंमत ८९९ रुपये आहे. कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी यामध्ये एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ईएनसी) सुविधेसह चार मायक्रोफोन्स आणि ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे.
कमी किंमतीत चांगली बॅटरी लाईफ ऑफर करणाऱ्या पर्यायांपैकी एक म्हणजेच बाउल्ट ऑडिओ झेड४०. याची किंमत ८९९ रुपये आहे. यामध्ये ६० तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा दावा करण्यात आला आहे. या ईअरबड्समध्ये १० मिमी ड्रायव्हर्स, कॉलिंगसाठी झेन ईएनसी मायक्रोफोन तंत्रज्ञान आणि लो लेटन्सी गेमिंग सपोर्ट ऑफर केला जात आहे.