
कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री... 200MP कॅमेरा आणि सॅटेलाइट कॉलिंगने सुसज्ज
हुवावे नोव्हा 16 अल्ट्रा स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4,699 CNY म्हणजेच सुमारे 66 हजार रुपये आहे. तर 512GB मॉडेलची किंमत 5,199 CNY म्हणजेच सुमारे 73 हजार रुपये आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची 5,799 CNY म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हुवावे नोव्हा 16 प्रोच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,899 CNY म्हणजेच सुमारे 55 हजार रुपये आहे. तसेच 512GB मॉडेलची किंमत 4,399 CNY म्हणजेच सुमारे 62 हजार रुपये आणि 1TB मॉडेलची किंमत 4,999 CNY म्हणजेच सुमारे 71 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने लाँच केलेल्या प्रो आणि अल्ट्रा या दोन्ही मॉडेलमध्ये 6.84-इंच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz पर्यंत LTPO एडॅप्टिव रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे. डिव्हाईस कुनलुन ग्लास प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. प्रो आणि अल्ट्रा हे दोन्ही स्मार्टफोन्स हार्मनी ओएस 6.1 ने सुसज्ज आहेत आणि यामध्ये हुआवेचे किरीन 9010S चिपसेट देण्यात आले आहे.
प्रो आणि अल्ट्रा या दोन्ही मॉडेल्समध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. अल्ट्रा व्हेरिअंटमध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 7.5W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
हुवावे नोव्हा 16 अल्ट्रा – कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये ओआयएसह 200-मेगापिक्सेलचा आरवायवायबी प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच ओआयएस सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा आरवायवायबी पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड मॅक्रो कॅमेरा आणि एक रेड मेपल कलर सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
हुवावे नोव्हा 16 प्रो – दुसऱ्या बाजूला Nova 16 Pro मध्ये देखील असाच कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड मॅक्रो लेंस समाविष्ट आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्ही 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता. याशिवाय दोन्ही डिव्हाईसमध्ये AI-पावर्ड इमेजिंग टूल्स, AI-असिस्टेड कंपोजीशन, पोर्ट्रेट एन्हांसमेंट आणि टेलीफोटो इमेज ऑप्टिमाइजेशन सपोर्ट देखील मिळणार आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये तियानटोंग सॅटेलाइट कॉलिंग, सॅटेलाइट पेजिंग, द्विमार्गी बेईडू सॅटेलाइट मेसेजिंगची सुविधा यासारखे काही प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत. डिव्हाईसमध्ये IP68 आणि IP69 प्रोटेक्शन मिळणार आहे.
Ans: होय, Huawei कडे अनेक 5G स्मार्टफोन आणि नेटवर्क तंत्रज्ञान उत्पादने उपलब्ध आहेत.
Ans: काही Huawei डिव्हाइसेसमध्ये Android आधारित EMUI तर काही मॉडेल्समध्ये HarmonyOS मिळते.
Ans: Huawei स्मार्टफोन चांगली बॅटरी लाइफ आणि पॉवर मॅनेजमेंटसाठी ओळखले जातात.