Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

I4C आणि Amazon India ची ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध देशव्यापी ग्राहक जनजागृती मोहीम

सणासुदीच्या खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी शिक्षण आणि जनजागृतीद्वारे केलेले हे पहिले सहकार्य आहे. ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्याबाबतल जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2025 | 03:35 PM
ऑनलाईन घोटाळ्यांसंदर्भात जनजागृती (फोटो सौजन्य - iStock)

ऑनलाईन घोटाळ्यांसंदर्भात जनजागृती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने स्थापन केलेले इंडियन सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) आणि अमेझॉन इंडिया यांनी एकत्र येऊन #ScamSmartIndia ही देशव्यापी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्यापासून ग्राहकांचे संरक्षण करणे आहे. हे भागीदारी उपक्रम फसवणुकीबाबतची साक्षरता समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित असून, शिक्षण, जनजागृती आणि तंत्रज्ञानाधारित प्रतिबंध यांचा संगम घडवून ती अधिक सुलभ, समजण्यास सोपी आणि कृतीक्षम करण्याचे ध्येय आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, येत्या काही महिन्यांत I4C आणि अमेझॉन राष्ट्रीय तसेच प्रादेशिक स्तरावर विविध उपक्रम राबवतील. यात गुंतागुंतीच्या फसवणूक प्रकारांना सोप्या आणि समजण्यासारख्या सुरक्षा टिप्समध्ये बदलणारी सोशल मीडिया सामग्री, लाखो घरांपर्यंत पोहोचणाऱ्या सुरक्षा सूचना असलेले डिजिटल जाहिराती, प्रत्येक डिलिव्हरीला वैयक्तिक सुरक्षा संदेशात रूपांतरित करणारी अमेझॉन पॅकेजेसमधील शैक्षणिक पत्रके, सणासुदीच्या खरेदी हंगामात ग्राहकांना सुरक्षित खरेदीसाठी मार्गदर्शन करणारे ‘स्कॅम-फ्री सप्टेंबर’ उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला बहुभाषिक टिप्स आणि फसवणूक ओळख व प्रतिबंधासाठी एआय-आधारित उपाय विकसित करण्यासाठी राष्ट्रीय हॅकाथॉन यांचा समावेश आहे.

फसवणूक कशी ओळखावी

I4C चे संचालक श्री निशांत कुमार म्हणाले, “सणासुदीच्या काळात खरेदी हा प्रत्येक भारतीय कुटुंबाचा नैसर्गिक भाग असतो. पण याच काळात फसवणूक करणाऱ्यांची हालचालही वाढते आणि ते विशेषत: पहिल्यांदाच इंटरनेट वापरणारे ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक अशा असुरक्षित गटांना फसवण्याचा प्रयत्न करतात. अमेझॉनसोबतची ही भागीदारी ग्राहकांना फसवणूक कशी ओळखावी आणि त्याच्या जाळ्यात अडकण्यापासून कसे वाचावे याबाबत जागरूक करेल. भारतात अमेझॉनसोबत मिळून ऑनलाईन फसवणूक रोखणे आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे.”

कसा होतो ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ टीप्स फॉलो करा

ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा 

अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष – लीगल, राकेश बक्षी म्हणाले, “अमेझॉनसाठी ग्राहकांचा विश्वास हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. जेव्हा फसवणूक करणारे ग्राहकांना फसवण्यासाठी प्रसिद्ध ब्रँडचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरतात, तेव्हा ते केवळ व्यवसायांचे नुकसान करत नाहीत, तर देशाच्या संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेवरील ग्राहकांचा विश्वासही कमी करतात. I4C सोबतच्या आमच्या भागीदारीतून आम्ही अशा व्यावहारिक उपाययोजना निर्माण करण्यासाठी सक्रिय पावले उचलू इच्छितो, ज्यामुळे ग्राहकांना फसवणूक ओळखता येईल, त्यापासून बचाव करता येईल आणि त्याबाबत तक्रारही करता येईल.”

ही भागीदारी सुरक्षित डिजिटल भारत घडविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित करते. ही घोषणा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाली आहे, कारण भारतातील निम्म्याहून अधिक फसवणूकीची प्रकरणे ऑनलाईन घडतात आणि अलीकडेच आलेल्या मॅकाफी अहवालानुसार सणासुदीच्या खरेदी हंगामात हा धोका विशेषतः तुलनेने जास्त असतो.

हा उपक्रम अमेझॉनच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही पुढे नेतो. कंपनी देशभरात ग्राहकांना सुरक्षित ऑनलाईन खरेदी पद्धतींबाबत शिक्षित करण्यासाठी विविध औद्योगिक संस्थांसोबत सक्रियपणे काम करते आणि क्षमता वाढविणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करते.

डिजीटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? अशा घोटाळ्यांपासून सुरक्षिततेसाठी करा 5 महत्त्वपूर्ण उपाय

Web Title: I4c and amazon india launch nationwide consumer awareness campaign against online fraud and scams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • amazon
  • online fraud
  • Tech News

संबंधित बातम्या

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
1

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर
2

BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली
3

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली

Oppo ने लाँच केला नवा फोन, 7000mAh बॅटरीने सुसज्ज; किंमतही खिशाला परवडणारी, कमालीचे फिचर्स
4

Oppo ने लाँच केला नवा फोन, 7000mAh बॅटरीने सुसज्ज; किंमतही खिशाला परवडणारी, कमालीचे फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.