Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगीत क्षेत्रात AI चा वाढता वापर! 97% वापरकर्त्यांना ओळखणे कठीण, काय म्हणतंय संशोधन?

Deezer नुसार नवीन गाण्यांपैकी ४४% गाणी AI-निर्मित असून दररोज ७५ हजार ट्रॅक्स अपलोड होत आहेत. AI गाण्यांना प्लेलिस्ट व शिफारसीतून वगळून कंपनीने नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 08:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

संगीत क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)चा प्रभाव झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. Deezer या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, आता प्लॅटफॉर्मवर अपलोड होणाऱ्या नवीन गाण्यांपैकी तब्बल ४४ टक्के गाणी AI-निर्मित आहेत. दररोज सुमारे ७५ हजार AI-निर्मित ट्रॅक्स अपलोड होत असून, महिन्याला हा आकडा २० लाखांहून अधिक आहे. या वाढत्या ट्रेंडमुळे संगीत उद्योगात मोठा बदल घडत असल्याचे दिसून येत आहे.

USB Killer : ५०० रुपयांची एक चूक अन् लाखोंचे क्षणात नुकसान; अनोळखी पेन ड्राईव्ह ठरतोय घातक

मात्र, AI-निर्मित संगीताचा वापर अजूनही मर्यादित आहे. एकूण स्ट्रीमिंगपैकी केवळ १ ते ३ टक्केच गाणी AI-निर्मित असतात. यातील तब्बल ८५ टक्के स्ट्रीम्स फसवणुकीशी संबंधित असल्याचे ओळखून कंपनीकडून त्यांचे मोनेटायझेशन थांबवले जाते. त्यामुळे AI म्युझिकचा वापर वाढत असला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

गेल्या काही महिन्यांत AI गाण्यांच्या अपलोडमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये दररोज ६० हजार ट्रॅक्स, नोव्हेंबरमध्ये ५० हजार, सप्टेंबरमध्ये ३० हजार, तर २०२५ च्या सुरुवातीला फक्त १० हजार ट्रॅक्स अपलोड होत होते. AI म्युझिक ओळखण्यासाठी Deezerने खास टूल विकसित केले असून, त्याद्वारे अशा गाण्यांची ओळख पटवली जाते. AI-निर्मित गाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी Deezerने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशा गाण्यांना अल्गोरिदमिक शिफारसींमधून काढून टाकले जाते आणि संपादकीय प्लेलिस्टमध्ये त्यांचा समावेश केला जात नाही. तसेच कंपनीने आता AI गाण्यांचे उच्च दर्जाचे (hi-res) व्हर्जन साठवणेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, AI गाण्यांचा प्रभाव इतका वाढला आहे की अलीकडेच एक AI-निर्मित गाणे अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये iTunes चार्टमध्ये अव्वल ठरले. Deezerचे CEO Alexis Lanternier यांनी सांगितले की, “AI म्युझिक आता छोटा ट्रेंड राहिलेला नाही. कलाकारांचे हक्क जपण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्राने एकत्र येणे गरजेचे आहे.” Deezerने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ९७ टक्के लोकांना AI आणि मानवी गाण्यांमधील फरक ओळखता येत नाही. तसेच ५२ टक्के लोकांनी AI गाणी मुख्य चार्टमध्ये समाविष्ट करू नयेत, असे मत व्यक्त केले. तर ८० टक्के लोकांनी AI गाण्यांवर स्पष्ट लेबल असावे, अशी मागणी केली आहे.

Tech News : इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ? स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?

विशेष म्हणजे, Deezerने जून २०२५ पासून AI गाण्यांना टॅग करणे सुरू केले असून, त्या वर्षातच १.३४ कोटी AI ट्रॅक्स टॅग केले. इतर प्लॅटफॉर्म्स जसे Spotify आणि Apple Music हे देखील AI म्युझिकसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. त्यामुळे भविष्यात AI आणि संगीत यांचा संगम आणखी वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Increasing use of ai in the music industry 97 of users find it difficult to identify

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • ai
  • Indian Music

संबंधित बातम्या

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
1

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
2

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
3

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
4

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.