फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 2,19,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. स्मार्टफोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन नेब्युला टील आणि प्रिझम ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.
लाँच ऑफरअंतर्गत, विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोन 30 महिन्यांसाठी 7,333 रुपयांच्या ईएमआय पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. कंपनी झिरो डाउनपेमेंट आणि 26,400 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक ऑफर करत आहे. यासोबतच कंपनी 12 टक्के व्हि-अपग्रेड एक्सचेंज बोनस आणि 40 टक्क्यांपर्यंत व्हि-शिल्ड स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन देणार आहे. विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोनच्या खरेदीवर 26,400 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक, 10 टक्क्यांपर्यंत एक्सचेंज बोनस किंवा 24 महिन्यांपर्यंत ‘नो-कॉस्ट ईएमआय’ ऑफर केला जाणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी तीन महिन्यांसाठी गूगल एआय प्रो देखील ऑफर करणार आहे. (फोटो सौजन्य: Vivo)
नवीन विवो फोल्ड स्मार्टफोनमध्ये 8.02-इंच फोल्डेबल अमोलेड पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रेजोल्यूशन 2,504 x 2,312-पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेनसिटी 424 पीपीआय आणि 100 टक्के डीसीआय-पी3 कवरेज, टच सँपलिंग 300Hz आणि एचडीआर सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.51-इंच अमोलेड कवर डिस्प्ले दिला आहे. याचे रेजोल्यूशन 1,120 x 2,528-पिक्सेल आहे. इनर आणि आउटर डिस्प्लेचे फीचर समान आहेत.
हा फोन 3nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 सुपर एडिशन चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB च्या यूएफएस 4.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. हा नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 17वर आधारित ओरिजीनओएस 7सह उपलब्ध आहे.
विवो एक्स फोल्ड 6 मध्ये Zeiss-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सेलचा f/1.68 कॅमेरा आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल f/2.05 अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल f/2.57 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे, जो 100x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनच्या आउटर आणि इनर डिस्प्लेमध्ये 20 मेगापिक्सेलचे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात आले आहे. हा फोन 8K रेजोल्यूशन व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
विवोने लाँच केलेल्या फोल्डेबल फोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,900mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, जीपीएस, ग्लोनास, बेईडौ, गॅलिलिओ, QZSS आणि NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. हा विवो स्मार्टफोन IP58 आणि IP59 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.






