India Pakistan War: सोशल मीडियावर व्हायरल होतायत फेक पोस्ट! सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना सावध राहण्याचा दिला सल्ला
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचे हे हल्ले देखील भारताने परतवून लावले. गुरुवारी रात्री दोन्ही देशांमध्ये हल्ले – प्रतिहल्ले सुरु होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या युद्धादरम्यान सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. कधी हे दावे भारताच्या बाजूने आहेत तर कधी हे दावे पाकिस्तानच्या बाजूने आहेत.
सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांना भडकण्यासाठी अनेक खोट्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता सोशल मीडिया युजर्ससाठी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या पोस्टवर विश्वास ठेऊ नका. शिवाय भारतीय नागरिकांमधील तणाव वाढेल अशी कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नका. याबाबत PIB फॅक्ट चेकने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. PIB फॅक्ट चेकने पोस्टमध्ये पाकिस्तानचा प्रचार केल्या जाणाऱ्या खोट्या पोस्टबाबत वॉर्निंग देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पोस्टमध्ये नागरिकांना Facebook, WhatsApp, X आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारी माहिती सावधनापूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासण्यास सांगण्यात आलं आहे. कारण एक चुकीची पोस्ट मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण करू शकते.
In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.
It’s crucial to scrutinize every piece of information carefully.
If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,… pic.twitter.com/YomXZUKmpH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025
पीआईबी फॅक्ट चेक टीमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्याची सत्यता तपासा. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तुम्हाला भारतीय सशस्त्र दलाबद्दल किंवा भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाबद्दल कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास याबाबत तक्रार करावी, असं सूचना आणि प्रसारण मंत्रालय (Ministry of Information and Broadcasting) च्या नोडल एजेंसीने नागरिकांना सांगितलं आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, येत्या काही दिवसांत तुमचा सोशल मीडिया #पाकिस्तान प्रायोजित प्रचाराने भरलेले असेल. यावेळी तुम्ही प्रत्येक माहिती काळजीपूर्वक वाचा. यावेळी जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद माहिती आढळली, जी भारतीय सशस्त्रसंबंधित किंवा सध्याच्या घटनांनवर आधारित आहे, तर अशी पोस्ट #PIBFactCheck वर रिपार्ट करा. WhatsApp: +91 8799711259 ईमेल: Factcheck@pib.gov.in