Operation Sindoor: काय आहे 'Loitering Munition' टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?
भारतीय सैन्याने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं, ज्यामध्ये पाकिस्तानातील 9 स्थळांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (PoJK) मधील 9 दहशतवादी स्थळांचा समावेश होता. भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली आहेत. ही संपूर्ण कारवाई 6 मे रोजी रात्री करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारताने ‘Loitering Munition’ या टेक्नोलॉजीचा वापर केला.
Operation Sindoor: सोन्याच्या किंमतीवरही पाकिस्तान हल्ल्याचा परीणाम, तब्बल 4 हजारांनी वाढला भाव
‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी नक्की आहे? या टेक्नोलॉजीच्या मदतीने कशा प्रकारे भारताने पाकिस्तानला निस्तनाबूत केलं, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक आहे. त्यामुळे आता सर्वात आधी ‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी नक्की आहे आणि या टेक्नोलॉजीने भारतीय सैन्याला कशा प्रकारे मदत केली, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Loitering Munition या टेक्नोलॉजीला सामान्यपणे ‘आत्मघाती ड्रोन’ असं देखील म्हटलं जात. हे एक स्मार्ट गॅझेट आणि शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने शत्रुंचा पराभव करण्यासाठी मदत होते. हे शस्त्र पहिल्यांदा ड्रोनप्रमाणे हवेत उडतं आणि ठिकाणांची पाहणी करतो. जेव्हा त्या ठिकाणांवर जेव्हा एखादा शत्रू दिसतो, तेव्हा ते मिसाइलप्रमाणे हल्ला करते. हे शस्त्र ड्रनप्रमाणे बराच वेळ आकाशात उडत असतात, याच कारणामुळे याला ‘Loitering’ असं म्हटलं जात. आकाशात उडत असताना ज्यावेळी एखादा शत्रू त्यांच्या नजरेस पडतो, ते एखाद्या मिसाइलप्रमाणे त्याच्यावर हल्ला करते.
अचूक निशाणा – ही टेक्नोलॉजी त्याच्या शत्रूवर अगदी अचूक निशाणा लावते.
नुकसान कमी होतं – ही टेक्नोलॉजी केवळ त्याच्या शत्रूवर हल्ला करते आणि सामान्य माणसं किंवा आजूबाजूच्या परिसराला नुकसान करत नाही.
रियल-टाइम कंट्रोल: हे ऑपरेटरद्वारे थेट नियंत्रित केले जाऊ शकतात किंवा ऑटोनॉमस पद्धतीने देखील कार्य करू शकतात.
रिस्क नाही – याचा वापर करताना सैन्याचा जीव धोक्यात घातला जात नाही.
ही टेक्नोलॉजी चालत्या – फिरत्या शत्रूंवर देखील वार करण्यासाठी सक्षम आहे.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाची हल्ला केली. यानंतर भारताने त्वरित कारवाई केली. भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेना यांनी ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. यावेळी पाकिस्तानच्या 9 दहशतावदी स्थळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी Loitering Munition चा वापर करण्यात आला होता. हल्ल्यात Jaish-e-Mohammed (JeM) आणि Lashkar-e-Taiba (LeT) सारख्या दहशतवादी संघटनांची ठिकाणं निशाण्यावर होती. या ठिकाणांना निस्तानाबूत करण्यासाठी Loitering Munition टेक्नोलॉजी वापरण्यात आली.
या कारवाईद्वारे भारताने एकाच वेळी दोन संदेश दिले आहेत आणि ते म्हणजे भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही उदारता दाखवणार नाही. पण उत्तर असे असेल जे विचारपूर्वक, मर्यादित आणि अचूकपणे दिले जाईल. भारताने केलेल्या या कारवाईमुळे आता पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे.