India Pakistan War: भारत - पाक युद्धामुळे Samsung Galaxy S25 Edge चं लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम अनेक गोष्टींवर होच असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील या वाढत्या तणावामुळे गॅझेट्सचं लाँचिंग ईव्हेंट पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. मे महिन्यात भारतात अनेक स्मार्टफोन लाँच केले जाणार होते. ज्याबाबत सतत अपडेट देखील समोर येत होते. मात्र आता हे लाँचिंग ईव्हेंट पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड
मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी दिल्लीत Samsung Galaxy S25 Edge चा लाँच ईव्हेंट आयोजित केला जाणार होता. मात्र सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती लक्षात घेता हा लाँच ईव्हेंट पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
एका अहवालानुसार, Samsung द्वारे दिल्लीत 13 मे रोजी Galaxy S25 Edge चा लाँच ईव्हेंट आयोजित केला जाणार होता. मात्र आता हा ईव्हेंट पुढे ढकलला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत विधान जारी करण्यात आलं नाही. असं सांगितलं जात आहे की, टेक दिग्गज कंपनी कोरिया स्थित हेडक्वार्टरकडून मिळणाऱ्या आदेशांची वाट पाहत असावी.
आगामी Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोन टाइटेनियम जेट ब्लॅक, टाइटेनियम सिल्वर आणि टाइटेनियम आइस ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या प्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S25 Utra आणि Galaxy S25+ सह Galaxy S25 सिरीजमध्ये सहभागी होईल. हा स्मार्टफोन 80 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोन लाँचबाबत टिझर शेअर करताना कंपनीने सांगितलं होतं की, यामध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनचा डिस्प्ले Gorilla Glass Ceramic 2 ने प्रोटेक्टेड असणार आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईट आणि अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
रिपोर्ट्सवप विश्वास ठेवला तर अपकमिंग स्लिम फोनची थिकनेस केवळ 5.83mm असण्याची शक्यात आहे. या स्मार्टफोनमध्ये टाइटेनियम अलॉय फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. सॅमसंगच्या या अपकमिंग फोनमध्ये Snapdragon 8 Elite SoC सह 3,900mAh बॅटरी दिली जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.55-inch 120Hz AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.