India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड
पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. यानंतर अनेक आरोप – प्रत्यारोप सुरु झाले. भारताने एयर स्ट्राइक केली आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर भारतात मॉक ड्रिल आणि ब्लॅकआऊट सुरु करून नागरिकांना जागरुक करण्यात आलं. या सर्व गोष्टी सुरु असतानाच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. मात्र इंडियन एअर फोर्सने हे सर्व हल्ले परतवून लावले. काल 9 मे रोजी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी देखील भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतावून लावले.
India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता
सध्याच्या या संर्घषाच्या काळात आपण अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाच्या सूचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला टॉप सेफ्टी अॅप्स मदत करणार आहेत. आता आम्ही तुम्हाला अशा काही सेफ्टी अॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे संघर्षाच्या काळात अलर्ट राहण्यासाठी तुम्हाला मदत करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे. यासाठी भारत सरकारद्वारे हे 112 इंडिया अॅप सुरु करण्यात आलं आहे. युद्धाच्या काळात नागरिकांनी अलर्ट राहावं यासाठी भारत सरकारद्वारे हे इमरजेंसी रिस्पॉन्स नागरिकांची मदत करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. या अॅपच्या मदतीने 112 नंबर वर कॉल, एसएमएस, ईमेल किंवा वेब पोर्टलच्या मदतीने कोणत्याही अपातकालीन स्थितिमध्ये तुमची मदत केली जाऊ शकते.
सध्या सुरु असणाऱ्या संघर्षाच्या काळात हे अॅप प्रत्येकासाठी अत्यंत फायद्याचे आहे. हे अॅप युजर्सना रियल-टाइम अलर्ट देतात. याच्या मदतीने एसओएस अलर्ट, इमरेजेंसी रिपोर्टिंग आणि लोकेशन शेयर सारख्या सेवा दिल्या जातात.
bSafe हा एक स्मार्ट सेफ्टी अॅप आहे, ज्यामध्ये व्हॉिस अॅक्टिवेशन, लाइव ऑडियो रिकॉर्डिंग, रियल-टाइम लोकेशन शेयरिंग, फेक कॉल्स, ट्रॅकिंग आणि अलार्म सारखे फीचर्स दिले जातात. तुमच्या सुरक्षेसाठी हे अॅप नेहमीच फायद्याचे ठरते. हे अॅप प्रत्येक भारतीय युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे आहे. हे अॅप पर्सनल आणि वर्कप्लेस सुरक्षा वाढवते.
हे अॅप नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट द्वारा विकसित करण्यात आलं आहे. जे त्सुनामी, भूकंप, चक्रवादळी, हीटवेव सारख्या प्राकृतिक आपत्तींपासून वाचण्यासाठी रियल-टाइम जियोटॅग्ड अलर्ट देते.
हे अॅप अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अॅप विशेषत: महिलांसाठी आणि सोलो ट्रॅवल करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. हे परिसर आणि प्रवास मार्गांचे सुरक्षितता रेटिंग, लाइटिंग, विजिबिलिटी, गर्दी आणि सुरक्षेची उपस्थिती यासारख्या पॅरामीटर्सवर आधारित आहे. अॅपमध्ये रूट सजेशन, रियल-टाइम लोकेशन शेयरिंग आणि सुरक्षा नकाशे देखील समाविष्ट आहेत.