गेमर्ससाठी Infinix घेऊन आलाय खास स्मार्टफोन, पावरफुल प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स! 11 हजारांहून कमी आहे किंमत
Infinix ने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Hot 60 5G+ भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची टक्कर लावा, पोको सारख्या स्मार्टफोनसोबत होणार आहे. हा नवीन स्मार्टफोन 6 जीबी रॅमसह मीडियाटेकच्या Dimensity 7020 SoC सह लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर देखील या स्मार्टफोनबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Infinix Hot 60 5G+ बाबत अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र आता अखेर हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Infinix Hot 60 5G+ स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये आहे. लाँच ऑफरसह तुम्ही हा स्मार्टफोन 500 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. या ऑफरसह, हा इन्फिनिक्स फोन 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. ज्यामुळे हा स्वस्त स्मार्टफोन तुम्हाला आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Ye hai asli HOTness! 🔥🔥🔥
Infinix HOT 60 5G+, with the most advanced AI and 90fps smooth gaming is here at a special launch price of just ₹9,999*!
Sale starts 17th July, 12PM
Check out karo: https://t.co/AYk0tuRc7j#HOT605G #InfinixAI pic.twitter.com/tb2mN7DldE
— Infinix India (@InfinixIndia) July 11, 2025
Infinix Hot 60 स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनची जाडी 7.8mm आहे आणि हा स्मार्टफोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. Infinix Hot 60 5G+ फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन केवळ सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा समावेश आहे. फोनचे स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये Hot 60 मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये
सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस XOS 15 वर चालतो. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे फोन 5 वर्षे लॅगशिवाय चालणार आहे.
Infinix च्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या इन्फिनिक्स फोनमध्ये एक कस्टमायझ करण्यायोग्य बटण देखील आहे, जे आयफोनमध्ये आढळणाऱ्या अॅक्शन बटणासारखे आहे. कंपनीने त्याला एआय बटण असे नाव दिले आहे, जे 30 हून अधिक अॅप्सना सपोर्ट करते.