Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!
Flipkart GOAT Sale 2025 हा 12 जुलैपासून सुरु होणार असून या सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण तुम्हाला या सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अगदी कमी किंमतीत प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला Galaxy S24 FE (8GB + 128GB) 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये Galaxy S24 FE (8GB + 128GB) केवळ 35,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 59,999 रुपये आहे. मात्र या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तर या स्मार्टफोनचे 256GB व्हेरिअंट आता केवळ 41,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 65,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता आम्ही तुम्हाला या डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि बेनिफिट्सबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला स्मार्टफोनच्या खरेदीवर वेगवेगळ्या बँक ऑफर्स आणि इतर फायदे मिळतील. स्मार्टफोनवरील डिस्काऊंटसोबतच तुम्हाला Axis, HDFC, IDFC First, RBL, Bob, HSBC कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टेंट बँक डिस्काउंट देखील दिलं जाणार आहे. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. याशिवाय अनेक कार्ड्सवर No‑Cost EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7‑इंचाचा Dynamic AMOLED 2X फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये IP68 water-and-dust resistance आहे. स्मार्टफोनमध्ये Galaxy AI- Circle to Search आणि Live Translate फीचर देण्यात आले आहेत.
Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये Exynos 2400e प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी, Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 50MP मेन + 8MP टेलीफोटो (3× ऑप्टिकल झूम), 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेटअप आणि 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 7 वर्षांपर्यंत Android आणि सिक्योरिटी अपडेट देतो.
जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स हवे असतील, तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता, जो गॅलेक्सी एआय सह फ्लॅगशिप-क्लास फीचर्स ऑफर करतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मॉडेलिंग इत्यादींसाठी यात चांगले कॅमेरा रिझोल्यूशन आहे. जर तुम्ही अल्ट्रा-प्रीमियम सॅमसंग फोल्डेबल किंवा एस-सिरीजवर लक्ष केंद्रित करत असाल आणि तुमचे बजेट 70,000+ असेल, तर तुम्ही या मालिकेतील इतर फोनबद्दल विचार करू शकता. विशेषतः जर तुम्हाला वायरलेस चार्जिंग, एस पेन किंवा मोठी बॅटरी हवी असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.