
नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, 'हे' भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात दोन रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या व्हेरिअंट्सचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, ही या फोनची सुरुवातीची किंमत आहे, ज्यामध्ये बँक ऑफर्सचा समावेश आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन सिल्क ग्लो पर्पल, डाइव ब्लू, थर्मो ऑरेंज आणि मिराज ग्रीन या 4 रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि देशातील रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. इथे ग्राहकांना 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑफर्स देखील मिळणार आहेत. (फोटो सौजन्य: Infinix)
डुअल-सिम (नॅनो + नॅनो) सपोर्ट असलेला लेटेस्ट इन्फिनिक्स हॉट 70 प्रो 5G आउट-ऑफ-द-बॉक्स अँड्रॉईड 16 वर आधारित एक्सओएस 16 वर चालतो. कंपनीच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनसाठी कंपनीने 3 मोठे ओएस OS अपग्रेड्स आणि 5 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे. या हँडसेटमध्ये 6.76-इंच फुल एचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 910 निट्सपर्यंत एचबीएम ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने असा दावा केला आहे की, याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.86 टक्के आहे. डिस्प्लेमध्ये आई-केयर फीचर आणि मोशन सिकनेस रिलीफ सपोर्ट देखील मिळणार आहे.
परफॉर्मंससाठी या फोनमध्ये माली-जी57 जीपीयूसह मीडियाटेक डाइमेंसिटी 7100 5G चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन प्रसिद्ध गेम्सना 90fps पर्यंत गेमिंग सपोर्ट ऑफर करतो आणि याचा AnTuTu स्कोर 7,80,000 हून अधिक आहे. स्टोरेजसाठी या डिव्हाईसमध्ये यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 2X लॉसलेस जूम, AI लाईव्ह फोटो, AI इरेजर, AI एक्सटेंडर आणि वन-टॅप व्लॉग मोडला सपोर्ट करतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनचे सर्वात मोठे आकर्षण त्याच्या रिअर पॅनेलवर दिलेले ॲक्टिव्ह मॅट्रिक्स क्यूब आहे. हा स्मार्टफोन उलटा म्हणजेच मागील बाजूने देखील इनकमिंग कॉल्स, मेसेज, चार्जिंग, लो बॅटरी, कॅमेरा, व्हिडीओ, काउंटडाउन आणि वेदर अलर्ट्ससाठी खास विजुअल इफेक्ट्स दाखवतो. याव्यतिरिक्त, हा फोन चालू असताना, म्यूजिक प्लेबॅक आणि गेमिंग करताना ‘अँबियंट लाइटिंग’ इफेक्ट्स प्रदर्शित करू शकतो.
आठ महिन्यांनंतर इस्रोची मोठी झेप! ‘नॉटी बॉय’चे दमदार कमबॅक; आकाशातून भारताचा पहारा होणार आणखी मजबूत
कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 45W फास्टचार्ज आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा चार्जर फोनला सुमारे 25 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत आणि साधारण 63 मिनिटांत पूर्ण 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करतो.