Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

मेटाने स्मार्ट ग्लासेसने रेकॉर्ड केलेल्या कंटेटवर आता Instagram ने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अनेक क्रिएटर्स मेटा ग्लासेसचा वापर करून लोकांच्या परवानगिशिवाय त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 12:09 PM
सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट... काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट... काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Instagram आता स्मार्ट ग्लासेसने गुपचूप शूट केलेले आणि लोकांचा गैरफायदा घेणारे व्हिडिओ हटवणार आहे.
  • परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांचे ‘POV’ किंवा ‘पिकअप प्रँक’ व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सवर कारवाई होणार आहे.
  • गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मेटाने अशा कंटेंटविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. इंस्टाग्राम आता एका अशा वाढत्या ट्रेंडवर कारवाई करणार आहे, ज्यामुळे यूजर्स अस्वस्थ झाले आहेत. हा एक असा ट्रेंड आहे, ज्यामध्ये क्रिएटर्स स्मार्ट ग्लासेस घालून अनोळखी लोकांचे लपून-छपून व्हिडीओ बनवतात आणि वायरल ‘पिकअप’ किंवा प्रँक व्हिडीओच्या नावाने हा कंटेट पोस्ट केला जातो. मात्र यामुळे इंस्टाग्राम यूजर्स प्रचंड हैराण झाले आहेत. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता कंपनीने अशा व्हिडीओ कंटेटवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

पॉइंट-ऑफ-व्यू व्हिडीओ

मेटाच्या मालकीच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं असं म्हणणं आहे की, आता कंपनी स्मार्ट ग्लासेसने रेकॉर्ड करण्यात आलेले असे व्हिडीओ हटवणार आहे, ज्यामध्ये लोकांना त्रास दिला जात आहे, किंवा त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. हे पाऊल त्या POV (पॉइंट-ऑफ-व्यू) व्हिडीओच्या लाटेनंतर उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये क्रिएटर्स बीच, जिम किंवा गर्दीचे रस्ते यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अनोळखी महिलांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या माहिती किंवा परवानगीशिवाय व्हिडीओ बनवतात.  (फोटो सौजन्य – AI Created) 

Adam Mosseri काय म्हणाले?

एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी म्हटलं आहे की, कंपनी अशा व्हिडीओ कंटेटवर कारवाई करणार आहे. जर तुम्ही असा कंटेट पोस्ट करत आहात, ज्यामध्ये लोकांचा गैरफायदा घेतला जात आहे किंवा त्यांना त्रास दिला जात आहे, जसे की पिकअप लाइनवाले व्हिडीओ जे आम्ही पाहिले आहेत, असे व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवले जाणार आहेत. लोकांनी कोणत्याही सीक्रेट पद्धतीने दुसऱ्यांचे व्हिडीओ बनवावे, त्यांना त्रास द्यावा आणि असे व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करावे, अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आता आम्ही शक्य असलेल्या प्रत्येक पद्धतीने याचा सामना करणार आहोत.

दोन इंस्टाग्राम अकाउंट्स हटवले

रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, स्मार्ट ग्लासेसने शूट करण्यात आलेले असे व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे दोन मोठे इंस्टाग्राम अकाउंट्स (ज्यांचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते) हटवण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये महिला सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी संवाद साधताना दिसत होत्या, ज्यामुळे पाहणाऱ्यांना असे वाटत होते की ते सर्व काही त्या महिलेच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत.

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

AI-पावर्ड स्मार्ट ग्लासेसमुळे असे व्हिडीओ तयार करणं आता आणखी सोपं झालं आहे. स्मार्टफोन जो व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना अगदी सहज पाहू शकतो, त्याविरुद्ध स्मार्ट ग्लासेस क्रिएटर्स सहज संभाषण साधताना देखील व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. यामुळे गोपनीयता, संमती आणि आपले चित्रीकरण होत आहे याची लोकांना जाणीव आहे की नाही, याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. एखादे संभाषण फसवणूक आहे की नाही हे कसे ठरवले जाईल याबाबत अद्याप इंस्टाग्रामने कोणतेही वक्तव्य जारी केले नाही. तसेच कंटेट हटवण्यापूर्वी क्रिएटर्सना वॉर्निंग दिली जाणार आहे की नाही किंवा वारंवार नियम तोडल्यास थेट अकाऊंट डिलीट केले जाईल, याबाबत देखील अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

Web Title: Instagram to remove secret smart glasses pov videos crackdown on privacy violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • instagram
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.