देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
लावा विराट व्हि 1 5G आणि लावा विराट व्हि 1 या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 31 जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि लावा वेबसाईटवरून खरेदी करू शकणार आहेत. कंपनी लाँच ऑफरअंतर्गत स्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांची सूट देणार आहे. लावा विराट व्हि 1 5G ची किंमत 12,999 रुपये आहे. मात्र ऑफरअंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी केल्यास डिव्हाईसची किंमत 11,999 रुपये होणार आहे. लावा विराट व्हि 1 ची लाँच किंमत 9,999 रुपये आहे. मात्र ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनची किंमत केवळ 8,999 रुपये होणार आहे. ही ऑफर 31 जुलैपर्यंत मान्य असणार आहे. (फोटो सौजन्य: Lava)
लावा विराट व्हि 1 5G स्मार्टफोन व्हेरिअंटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाचा हा फोन IP64-रेटिंगसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये युनिसाॅक T8200 चिपसेटसह 4GB रॅम दिली आहे. स्मार्टफोन 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि एसडीकार्ड स्लॉटसह लाँच करण्यात आला आहे. लावाच्या या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 4GB वर्चुअल रॅम देखील मिळणार आहे.
लावा विराट वी1 5जी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच AI सेकेंडरी कॅमेरा लेंस देखील दिले आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. याशिवाय, लावा फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस मिळणार आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला या फोनवर जाहिराती किंवा आधीच इन्स्टॉल केलेले अनावश्यक ॲप्स दिसणार नाहीत. हा फोन ‘आर्या ब्लू’ आणि ‘सोनार गोल्ड’ अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
लावा विराट व्हि 1 स्मार्टफोनला 4जी सपोर्टसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाने या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे. या फोनला युनिसाॅक SC9863A प्रोसेसर आणि 4GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB पर्यंत वर्चुअल रॅम सपोर्ट देखील दिला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज आणि एसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या 4G फोनमध्ये क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस मिळणार आहे. हा फोन निलगिरी ब्लू आणि हिमालयन सिल्व्हर या रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.






