बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी
आयक्यूओओ झेड 11 लाईट स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,499 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,499 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,499 रुपये आहे. लाँच ऑफरअंतर्गत ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट्स 17,999, 19,999 आणि 22,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: iQOO)
लाँच ऑफरअंतर्गत कंपनी ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त, ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्डवर तीन महिन्यांचा ‘नो-कॉस्ट ईएमआय’ पर्याय उपलब्ध आहे. हा सेल 30 जुलैपासून iQOO चे ई-स्टोअर, ॲमेझॉन, विवो स्टोअर्स आणि किरकोळ विक्री केंद्रांवर सुरू होईल. आयक्यूओओ स्मार्टफोन मिडनाइट ब्लू आणि सोलर फ्लेम कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.
आयक्यूओओने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एचडी एलसीडी पॅनल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 1,600 x 720 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 1,200 निट्सची आहे. यासोबतच, फोनचा डिस्प्ले TÜV राइनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो.
फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 SoC सह 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. आयक्यूओओच्या या फोनमध्ये 6GB पर्यंत वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. माइक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे. ज्यामुळे फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सपोर्टवाला ओरिजिनओएस 6 सह लाँच केला आहे.
आयक्यूओओ झेड 11 लाईटमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा कॅमेरा 50-मेगापिक्सेल सोनी आईएमएक्स 852 आहे, ज्यासोबत 0.08-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट, पॅनोरमा, डॉक्युमेंट्स, टाइम-लॅप्स आणि स्लो मोशन यांसारखे कॅमेरा फीचर्स मिळणार आहेत.
आयक्यूओओ फोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 44W फ्लॅशचार्ज आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, डुअल नॅनो सिम सपोर्ट, डुअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट देखील दिला आहे. या डिव्हाईसमध्ये IP65 रेटिंग दिली आहे. याव्यतिरिक्त, हा फोन स्विस SGS 5-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स सर्टिफिकेशन, मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि ‘स्प्रिंग’ प्रोटेक्टिव्ह केससह येतो.






