Women’s Day 2025: प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये हे 5 Apps असलेच पाहिजे, या सोप्या स्टेप्स फॉलो करून आत्ताच करा डाऊनलोड
दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या वाढत्या प्रगतीसोबतच महिलांवरील हिंसाचार आणि छळाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक महिलांना प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटते. परंतु तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक उपयुक्त मोबाईल अॅप्स लाँच करण्यात आले आहेत. हे अॅप्स महिलांना संकटाच्या वेळी त्वरित मदत करतात. चला तर मग या मोबाईल अॅप्सबद्दल जाणून घेऊया.
112 इंडिया मोबाइल अॅप्स हे भारत सरकारच्या इमरजेंसी रिस्पाँस सपोर्ट सिस्टम (ERSS) चा भाग आहे. हे अॅप देशातील बहुतेक राज्यांमध्ये काम करते आणि त्यात ऑडिओ आणि व्हिज्युअल अलार्म सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. आपत्कालीन परिस्थितीत या अॅपचा वापर केला जाऊ शकतो आणि तो पोलीस आणि इतर सुरक्षा सेवांना कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. याशिवाय या अॅपच्या मदतीने तुम्ही स्वत:सोबतच इतरांची देखील सुरक्षा करू शकता. हे अॅप घटनेच्या तपासात मदत करते आणि युजर्सना स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देते जेणेकरून ते गरजू लोकांना मदत करू शकतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
My Safetipin अॅप तुम्हाला अज्ञात भागात आणि शहरांमध्ये सुरक्षित मार्ग शोधण्यात मदत करते. हे केवळ सुरक्षित सार्वजनिक ठिकाणांबद्दल माहितीच देत नाही तर आपत्कालीन परिस्थितीत कुटुंब आणि मित्रांना तुमचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यास देखील अनुमती देते. हे अॅप इतर युजर्सनी दिलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे सुरक्षा रेटिंग देखील दाखवते. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या परिसराला सुरक्षितता रेटिंग देऊन तुम्ही इतरांना मदत करू शकता.
I’M SAFE – Women’s Safety App कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना आधी अलर्ट करण्याचा पर्याय देते, जेणेकरून ते लवकर मदतीसाठी पोहोचू शकतील. यात SOS अलर्ट, लोकेशन शेअरिंग, बनावट फोन कॉल आणि गुप्त ऑडिओ रेकॉर्डिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, हे अॅप महिला सुरक्षेशी संबंधित एनजीओ आणि काउंसलर्सशी संपर्क साधण्याची सुविधा देखील प्रदान करते.
Alerty अॅप एका वैयक्तिक अलार्मसारखे काम करते. हे अॅप युजर्सना आधीपासूनच सिलेक्ट केलेल संपर्क आणि एक अलार्म रिसीविंग सेंटरला त्वरित अलर्ट करण्याची परवानगी देते. हे अॅप रिअल-टाइम व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा देते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकते. हे विशेषतः एकट्या काम करणाऱ्या किंवा रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त आहे.
Women Security – Security App विशेषतः अशा महिलांसाठी डिझाइन केलेले आहे जे एकटे प्रवास करतात किंवा रात्री उशिरा बाहेर राहतात. या अॅपच्या मदतीने, तुमच्या आपत्कालीन संपर्कांना काही सेकंदात लोकेशन आणि परिस्थितीची माहिती पाठवता येते. यामध्ये पोलिसांना कॉल करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही तुमचा फोन हलवून किंवा बटण दाबून गुप्तपणे मदतीसाठी सिग्नल देऊ शकता.