Womens Day 2025: महिला दिनानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या 'हे' खास गॅझेट्स, रोजच्या जीवनात येतील कामी
दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या योगदानाला आणि धाडसाला समर्पित आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे एक विशेष स्थान असते, ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असते. आई, मुलगी, पत्नी किंवा बहीण असे नाते प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या खास नात्यांचे जतन करायचे असेल, तर येथे काही गिफ्ट आयडिया देणार आहोत ज्यातून तुम्ही निवड करू शकता आणि एक खास भेट या महिला दिनानिमित्त तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला देऊ शकता.
सहसा महिलांना गिफ्ट द्यायचं असेल तर अनेक ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये कपडे, पर्स, मेकअप किट, सँड्लस, यासांरख्या अनेक वस्तू आहेत. पण यंदा तुम्ही तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला महिला दिनानिमित्त खास गिफ्ट द्या. असं गिफ्ट जे त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना फायद्याचं ठरू शकतं. आता अशाच काही गॅझेट्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला महिला दिनानिमित्त गिफ्ट देऊ शकता. या खास दिवशी काही स्मार्ट भेटवस्तू देऊन हा दिवस संस्मरणीय बनवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
या यादीतील सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे U& i Solid Series Wireless Bluetooth in Ear Neckband. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही हे गॅझेट Amazon वरून फक्त 578 रुपयांना खरेदी करू शकता. हा ब्लूटूथ नेकबँड आहे, 5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे. हे नेकबँड एकदा चार्ज केल्यानंतर 12 तास टिकते. चार्ज होण्यासाठी 2 तास लागतात. याशिवाय, ते खूपच स्टायलिश दिसते.
Noise Pro 5 स्मार्ट वॉच फक्त हे या यादीतील मिड-रेंज प्रोडक्ट आहे. आजकाल, सामान्य घड्याळांपेक्षा स्मार्टवॉच बाजारात जास्त ट्रेंडमध्ये आहेत. खास गोष्ट म्हणजे Amazon द्वारे तुम्ही Noise Pro 5 स्मार्ट वॉच फक्त 2,999 रुपयांना खरेदी करू शकाल. हे स्मार्टवॉच खूपच छान दिसते. यामध्ये तुम्हाला 1.85 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच, या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.
Dreame AirStyle, 5-in-1 Hair Drying & Styling System for Curling, Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. सर्व महिलांना त्यांच्या केसांची नवीन हेअरस्टाईल करायला आवडते. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांना हे हेअर स्टायलिंग किट भेट देऊ शकता. हे 5-इन-1 हयर ड्राइिंग आणि कर्लिंग करण्याचे डिवाइस आहे.
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने नुकतेच Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 हे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. तुम्ही महिला दिनानिमित्त तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला हे स्मार्टफोन्स गिफ्ट करू शकता. सध्या स्मार्टफोनची गरज प्रत्येक व्यक्तिला आहे. सॅमसंगने लाँच केलेले हे स्मार्टफोन्समध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटससह डिस्प्ले आणि अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.