Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

iPhone 16e vs iPhone 16: iPhone 16e की iPhone 16 यातील कोणता आयफोन आपल्यासाठी बेस्ट ठरू शकतो आणि कोणता आयफोन बेस्ट फीचर्स देईल यासाठी अनेकजण गोंधळले आहेत. तुम्हीही यापैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 10:04 AM
iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने त्यांच्या आयफोन 16 सिरीजमधील स्वस्त iPhone 16e बुधवारी लाँच केला आहे. भारतात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या या स्वस्त आयफोनचं लाँचिंग पूर्ण झालं. खरं तर हा या वर्षातील पहिला आयफोन आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची आयफोन 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील सर्व आयफोन नेहमीप्रमाणे प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले.

iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

आता कंपनीने या लाईनअपचा विस्तार करत सिरीजमधील एक नवा आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. नवा आयफोन लाँच झाल्यामुळे काही युजर्समध्ये गोंधळ आहे. iPhone 16e की iPhone 16 नक्की कोणता आयफोन खरेदी करावा, यासाठी युजर्स पूर्णपणे गोंधळले आहेत. त्यामुळे आता आम्ही या दोन्ही आयफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल तुलना करणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या फीचर्स आणि तुमच्या बजेटनुसार आयफोनची खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest & Apple) 

किंमत आणि व्हेरिअंट

भारतात iPhone 16e ची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिअंटध्ये लाँच करण्यात आला आहे. iPhone 16e ग्राहक काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायामध्ये खरेदी करू शकता. iPhone 16 ची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे किंमतीच्या बाबतीत iPhone 16e परवडणारे मॉडेल आहे. iPhone 16e च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिअंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 89900 रुपये आहे. iPhone 16 सिरीजमधील बेस मॉडेलच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 79,900 रुपये आहे, 256GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.

डिस्प्ले

iPhone 16 मध्ये डायनॅमिक आयलंड आहे, तर नवीन आयफोनच्या डिस्प्लेमध्ये नॉच देण्यात आला आहे. या दोन्ही आयफोन्सचा डिस्प्ले साईज सारखाच आहे, पण iPhone 16 सोबत तुलना करता iPhone 16e चा पीक ब्राइटनेस थोडा कमी आहे. iPhone 16e मध्ये ग्लास बॅक आहे, तर iPhone 16 मध्ये कलर इन्फ्युज्ड ग्लास बॅक आहे.

कॅमेरा

iPhone 16 मध्ये कॅमेरा कंट्रोल्स आणि 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे, तर iPhone 16e मध्ये या दोन्हींची कमी आहे. iPhone 16 मध्ये ऑप्टिकल झूमसाठी तीन पर्याय आहेत, तर नवीन मॉडेलमध्ये त्यासाठी फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. iPhone 16 अनेक वेगवेगळ्या कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता तर iPhone 16e केवळ पांढरा आणि काळा या दोनचं रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे.

Galaxy A06 5G Launch: Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी देणार ‘काम का 5G’

चार्जिंग

iPhone 16e मध्ये 7.5 वॅट पर्यंत Qi वायरलेस चार्जिंग मिळते, तर iPhone 16 मध्ये 15 वॅट पर्यंत Qi2 वायरलेस चार्जिंग मिळते. iPhone 16 25W पर्यंत मॅगसेफ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो आणि मॅगसेफ केसेस, वॉलेट आणि वायरलेस चार्जर्सशी सुसंगत आहे, परंतु ही वैशिष्ट्ये iPhone 16e मध्ये उपलब्ध नाहीत.

Web Title: Iphone 16e vs iphone 16 what is the difference between them which is best tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.