Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

iPhone 17 Pro Max in Time Capsule: अमेरिकेने स्वातंत्र्याच्या 250 वर्षांच्या निमित्ताने एक अनोखा आणि चर्चेचा प्रयोग सुरू केला आहे. 2276 मध्ये उघडण्यासाठी जमिनीत पुरलेल्या टाइम कॅप्सूलमध्ये आयफोन 17 प्रो मॅक्स ठेवण्यात आला असून, तो भविष्यात सुरू होईल का याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 11:51 AM
250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेने स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त स्टेनलेस स्टीलच्या टाइम कॅप्सूलमध्ये आयफोन 17 प्रो मॅक्स ठेवून तो 2276 पर्यंत जमिनीत पुरला आहे.
  • आयफोनमध्ये 2026 मधील फोटो, नोट्स आणि डिजिटल माहिती साठवून भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करण्यात आली आहे.
  • तज्ज्ञांच्या मते 250 वर्षांनंतर बॅटरी खराब झाल्याने आयफोन सुरू होण्याची शक्यता कमी असली, तरी भविष्यातील तंत्रज्ञानामुळे डेटा वाचवता येऊ शकतो.
iPhone 17 Pro Max: तुम्ही कधी विचार केला आहे की, एखादा स्मार्टफोन जर जमीनीत पुरला आणि 250 वर्षांनंतर हा स्मार्टफोन चालू करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आता असाच एक प्रयोग अमेरिकेने हाती घेतला आहे. आतापर्यंतचा सर्वात ॲडव्हांस स्मार्टफोन आयफोन 17 प्रो मॅक्स 250 वर्षांसाठी जमिनीत पुरला आहे. 250 वर्षांनंतर म्हणजेच 2276 मध्ये देखील हा आयफोन चालू असेल का, हे तपासले जाणार आहे. खरं तर हा प्रयोग सर्वांनाच हैराण करणारा आहे.

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

4 जुलै 2026 रोजी स्वातंत्र्याचे 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अमेरिकेने फिलाडेल्फियामध्ये 900 पाउंड म्हणजेच सुमारे 408 किलोचे एक अतिशय मजबूत स्टेनलेस स्टील टाइम कॅप्सूल जमीनमध्ये पुरले आहे. आता हे टाइम कॅप्सूल थेट 250 वर्षांनी म्हणजेच 2276 मध्ये ओपन केले जाणार आहे. सर्वात विशेष म्हणजेच या टाईम कॅप्सूलमध्ये आजचा सर्वात ॲडव्हांस स्मार्टफोन आयफोन 17 प्रो मॅक्स (ऑरेंज) ठेवला आहे.  (फोटो सौजन्य: X)

आयफोनमध्ये दडलंय 2026 चे रहस्य

कॅप्सूलमध्ये आयफोन ठेवण्यामागे एक खास कारण आहे. आयफोनच्या नोट्स ॲपमध्ये 2026 या वर्षातील रोजच्या जीवनासंबंधित अनेक डिजिटल आर्टिफॅक्ट्स म्हणजेच फोटोज, नोट्स आणि दुसऱ्या गोष्टी लिहील्या आहेत. आयोजकांचे असे मत आहे की, आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच गोष्ट भविष्यातील लोकांना सांगायची असेल तर हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो.

2276 मध्ये आयफोन सुरु होईल का?

अमेरिकेतील हा प्रयोग सध्या सर्वत्र चर्चेत असून अनेकांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे की, जेव्हा 2276 मध्ये टाईम कॅप्सूल ओपन केले जाईल, तेव्हा आयफोन सुरु होईल का? तज्ज्ञांचे असे मत आहे की, 2276 मध्ये टाईम कॅप्सूल ओपन केल्यानंतर आयफोन सुरु होण्याची शक्यता फार कमी आहे. याचे कारण म्हणजे आयफोनमध्ये लिथियम-आयनचा वापर केला जातो, जो वेळेनुसार पूर्णपणे खराब होतो. मात्र जर भविष्यातील माणसांनी काही जुगाड करून किंवा नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून आयफोन चालू करण्यात यश मिळवले, तर त्यांना 250 वर्षांपूर्वींचे फोटो आणि नोट्स पाहायला मिळू शकतात. आजच्या काळापेक्षा म्हणजेच 2026 पेक्षा 2276 चे जग किती वेगळ असेल याचा अंदाज लावणं फार कठीण आहे.

जमिनीत पुरलेल्या या कॅप्सुलमध्ये केवळ आयफोनचं नाही तर एक आर्काइवल पेपर प्रिंट करून ठेवण्यात आला आहे. कॅलिफोर्निया राज्याने अँथ्रोपिकच्या ‘क्लाउड’ नावाच्या एआय टूलला एक भविष्यवाणी लिहिण्याचे काम दिले, जी न खराब होणाऱ्या संग्रहित कागदावर छापून कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली. या एआय भविष्यवाणीनुसार, 250 वर्षांत महामार्ग नाहीसे होतील आणि कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन व ब्रिटिश कोलंबिया एकत्र येऊन पॅसिफिक फेडरेशनची स्थापना करतील.

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

कॅप्सूलमध्ये आणखी काय?

या कॅप्सूलमध्ये ठेवलेल्या एका स्टीलच्या नाण्यावर अमेरिकेचे संपूर्ण संविधान आणि स्वातंत्र्याचे घोषणापत्र लिहीले आहे. यासोबतच न्यू हॅम्पशायरने त्यांच्या क्रांती युद्धाच्या इतिहासाची माहिती देणारे एक माहितीपत्रकही पाठवले आहे. ही टाइम कॅप्सूल दाबली जाऊन फुटू नये म्हणून दंडगोलाकार आहे. तसेच, पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी तिला इन्सुलेशनचा दुहेरी थर आहे. भविष्यातील लोकांना ही टाईम कॅप्सूल शोधण्यासाठी मदत मिळावी, यासाठी नॅशनल पार्क सर्विसच्या प्लॅनमध्ये याची माहिती जोडण्यात आली आहे आणि कॅप्सूल पुरण्यात आलेल्या ठिकाणी एक खास दगड देखील लावण्यात आला आहे.

Web Title: Iphone 17 pro max buried for 250 years will it still power on when the time capsule opens in 2276

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे
1

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार
2

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन
3

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन

सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल
4

सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.