
Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची बुकिंग Apple च्या ऑनलाइन स्टोअर आणि Apple Store App मधून करता येणार आहे. याशिवाय प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अधिकृत रिटेल पार्टनर्सकडेही फोनसाठी प्री-ऑर्डर करता येईल.
ग्राहकांनी आधी आपले मॉडेल, स्टोरेज आणि कलर निश्चित करावा. त्यानंतर संबंधित स्टोअरवर फोन निवडून उपलब्ध कॅशबॅक, EMI, एक्सचेंज आणि पेमेंट पर्याय तपासून प्री-ऑर्डर प्रक्रिया पूर्ण करता येईल.
iPhone 18 Pro ची भारतातील सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये आहे. तर iPhone 18 Pro Max ची किंमत 1,79,900 रुपयांपासून सुरू होते. दोन्ही स्मार्टफोन 256GB ते 2TB पर्यंतच्या स्टोरेज पर्यायांत उपलब्ध असतील.
Storage iPhone 18 Pro iPhone 18 Pro Max
256GB ₹1,64,900- ₹1,79,900
512GB ₹1,89,900- ₹2,04,900
1TB ₹2,39,900- ₹2,54,900
2TB ₹3,14,900 – ₹3,29,900
ग्राहकांना iPhone 18 Pro सीरिजमध्ये Black, Silver, Glacier आणि नवीन Burgundy असे कलर पर्याय मिळणार आहेत. त्यामुळे आवडता कलर आणि स्टोरेज कॉम्बिनेशन हवे असल्यास प्री-ऑर्डर सुरू होताच बुकिंग करणे फायदेशीर ठरू शकते.
निवडक American Express, Axis Bank आणि ICICI Bank कार्डवर इन्स्टंट कॅशबॅकचा लाभ मिळणार असल्याचे देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे. याशिवाय सहा महिन्यांच्या No-Cost EMI चा पर्यायही उपलब्ध असेल. iPhone 18 Pro साठी EMI सुमारे ₹26,316 प्रतिमहिना, तर iPhone 18 Pro Max साठी ₹28,817 प्रतिमहिना पासून सुरू होऊ शकते.
नवीन iPhone घेताना जुन्या डिव्हाइसच्या एक्सचेंजचाही पर्याय उपलब्ध असेल. iPhone 13 किंवा त्यानंतरच्या पात्र मॉडेलच्या ट्रेड-इनवर डिव्हाइसची स्थिती आणि मॉडेलनुसार ₹21,000 ते ₹81,500 पर्यंत क्रेडिट मिळू शकते.
दरम्यान, iPhone 18 Pro सीरिजसोबत सादर करण्यात आलेल्या फोल्डेबल iPhone Duo साठी ग्राहकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात त्याची प्री-बुकिंग 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल, तर विक्री 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याची सुरुवातीची किंमत ₹2,99,900 असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर