संग्रहित फोटो
अभिषेक पांडूरंग डहाळे (वय २३ रा. जे.के. टायर्स जवळ, दसक जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन. २०२५ मध्ये दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने संशयिताने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला नकार देत आपण फक्त मित्र व मैत्रीण असल्याचे बजावले होते. या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच संशयिताने गेल्या शुक्रवारी (दि.९) रात्री पिडीतेस नारायण बापू चौकात बोलावले.
पिडीता या ठिकाणी गेली असता संशयिताने पुन्हा लग्नाचा आग्रह धरला. तरूणीने त्यला स्पष्टपणे नकार दिला असता त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तरूणीच्या हातातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. माझ्याशी लग्न केले नाही तर तुझेही लग्न होवू देणार नाही, कुटूंबियांची बदनामी करेन आणि तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकीही दिली होती. यानंतर मात्र संशयिताने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून व व्हॉटसअपवर मॅसेज करून पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निरीक्षक बडे या गुह्याचा तपास करीत आहेत.
१५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला
आरोपी ज्ञानप्रकाश याचे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुलगी अल्पवयीन असल्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी या नात्याला कडाडून विरोध केला होता. घरच्यांच्या समजावणीनंतर मुलीने आरोपी ज्ञानप्रकाशसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. आपली प्रेयसी दुरावल्याने आणि तिच्या घरच्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे ज्ञानप्रकाश प्रचंड संतापला होता. याच रागातून त्याने अत्यंत क्रूर पाऊल उचलले. हातात धारदार शस्त्र घेऊन तो थेट मुलीच्या घरात घुसला. घरात शिरताच त्याने काहीही विचार न करता थेट मुलीच्या पालकांवर हल्ला चढवला. आरोपीने केलेल्या या अचानक आणि भीषण हल्ल्यात मुलीची आई, मेरी रेगिला, यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून घरात एकच खळबळ उडाली. आरोपीने मुलीचे वडील, मुथुकृष्णन, यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
Ans: अभिषेक पांडूरंग डहाळे (वय २३, रा. दसक, जेलरोड) याच्यावर तरुणीचा ऑनलाइन पाठलाग केल्याचा आरोप आहे.
Ans: लग्नास नकार दिल्यानंतर संशयिताने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच बदनामी करण्याची आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
Ans: या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक बडे करीत आहेत.






