
बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये
आयक्यूचा नवीन स्मार्टफोन 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB या रॅम आणि स्टोरेज पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,299 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 21,000 रुपये आणि टॉप एंड व्हेरिअंट असलेल्या 8GB+256GB मॉडेलची किंमत CNY 1,699 म्हणजेच सुमारे 24,000 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन सध्या चीनमध्ये विवोच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. डेजर्ट गोल्ड, मो यिंग आणि किंगफेंग या तीन रंगांच्या पर्यायांत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: iQOO)
कंपनीने लाँच केलेला नवीन iQOO Z11i एक डुअल सिम हँडसेट आहे, जो अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 83 टक्के एनटीएससी कवरेज, 90.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, या डिव्हाईसला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिली आहे आणि मजबूत बॉडीसाठी SGS 5-स्टार ड्रॉप आणि शॉक रेझिस्टन्स सर्टिफिकेशन मिळाले आहे.
परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिला आहे. ग्राफिक्ससाठी या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 613 जीपीयू दिला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकचा सपोर्ट दिला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, नव्या आयक्यू स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चर आणि ऑटोफोकससह सिंगल 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, जो 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉचमध्ये f/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. हे हँडसेट 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी सक्षम आहे.
आयक्यू स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी यूएसबी टाईप-सी पोर्टद्वारे 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने असा दावा केला आहे की, हे हँडसेट सिंगल चार्जवर 25.3 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम किंवा 21 तासांचा टॉक टाईम ऑफर करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1 आणि जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि IR ब्लास्टर सारखे सेंसर्स समाविष्ट आहेत.