संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज...
कंपनीने चीनमध्ये त्यांचे पहिले ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्स CNY 349 म्हणजेच सुमारे 4,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहेत. प्रारंभिक ऑफरचा भाग म्हणून ग्राहक मर्यादित काळापर्यंत हे हेडफोन्स CNY 297 म्हणजेच सुमारे 4,100 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. जॅज ब्लू, रॉक ब्लॅक आणि सिम्फनी व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायांत हे हेडफोन्स खरेदीसाठी उपलब्ध आहे. रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्स शाओमी वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स ग्लोबल मार्केटमध्ये किंवा भारतात कधी लाँच केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य: Redmi)
रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्समध्ये एक इंडिपेंडेंट एकूस्टिक चेंबरमध्ये 40mm चे टाइटेनियम-प्लेटेड डायनेमिक ड्राइवर्स दिले आहेत. हे 96kHz आणि 24-bit लॉसलेस क्वालिटी पर्यंत यूएसबी ऑडिओ प्लेबॅकला सपोर्ट करतात. ते हाय-रेस ऑडिओ प्रमाणित आहेत आणि त्यात चार प्रीसेट EQ प्रोफाइल्ससह 10-बँड कस्टम इक्वेलायझर आहे. हे हेडफोन्स 42dB पर्यंत ॲक्टिव नॉइज कँसलेशनला सपोर्ट करतात. ज्यामध्ये डीप, बॅलेन्स आणि लाईट मोड्स समाविष्ट आहेत. या डिव्हाईसमध्ये अडाप्टिव ANC आणि 5m/s पर्यंत वाऱ्याचा आवाज कमी करू शकणारी ट्रिपल-माइक्रोफोन AI कॉलिंग सिस्टिम देखील दिली आहे.
कनेक्टिविटीसाठी हे हेडफोन्स ब्लूटूथ, डुअल-डिवाइस पेयरिंग, ऑडियो शेयरिंग, नोटिफिकेशन ब्रॉडकास्ट आणि शाओमी हायपरकनेक्ट फीचर्सला सपोर्ट करतात. याच्या मदतीने यूजर्सना क्विक पेयरिंग, अचूक डिव्हाइस शोधणे आणि सुसंगत डिव्हाइसेसमध्ये ऑडिओ ट्रान्सफरचा आनंद घेता येतो. यूजर्स अनेक शाओमी डिव्हाइसेसमध्ये सहजपणे ऑडिओ स्विच करू शकतात.
WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्समध्ये 600mAh बॅटरी दिली आहे. याबाबत असा दावा करण्यात आला आहे की, सिंगल चार्जवर ही बॅटरी 72 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, डिव्हाईस केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगवर यूजर्सना 5 तासांचा लिसनिंग टाइम ऑफर करतो. या हेडफोन्सचे वजन सुमारे 263 ग्रॅम आहे आणि याचे डिझाईन फोल्डेबल आहे. आरामदायक वापरासाठी यामध्ये स्लो-रीबाउंड फोमने भरलेले प्रोटीन लेदर ईयर कुशन्स दिले आहेत. इअरकप्स 110 अंशांपर्यंत फिरू शकतात आणि 15 अंशांपर्यंत झुकू शकतात, तर ॲडजस्टेबल मेटल हेडबँड दीर्घकाळ आरामदायक अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे.






