Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी ‘या’ फोल्डेबल फोनला करणार ‘Good Bye’? कारण काय? जाणून घ्या

Xiaomi च्या फोल्डेबल फोनबाबत चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी Mix Flip लाईनअप बंद करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता यूजर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 01:22 PM
Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी 'या' फोल्डेबल फोनला करणार 'Good Bye'? कारण काय? जाणून घ्या

Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी 'या' फोल्डेबल फोनला करणार 'Good Bye'? कारण काय? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • रिपोर्ट्सनुसार Xiaomi त्यांच्या Mix Flip फोल्डेबल फोन लाईनअपला बंद करण्याचा विचार करत आहे.
  • Weibo वरील लीकनुसार Mix Flip 3 लाँच होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
  • वाढता उत्पादन खर्च आणि कमी रिटर्न हे या निर्णयामागचे संभाव्य कारण मानले जात आहे.
टेक कंपनी Xiaomi ने त्यांच्या करोडो चाहत्यांना एक मोठा झटका दिला आहे. चिनी ब्रँड एक फोल्डेबल लाइनअप बंद करण्याची तयारी करत आहे. हे लाईनअप Mix Flip असल्याचे सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, कंपनी यावर्षी या लाईनअपअंतर्गत फोन लाँच करणार नसल्याची माहिती आहे. तसेच भविष्यात देखील ही लाईनअप लाँच करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने त्यांच्या फ्लिप फोनच्या पुढील व्हेरिअंटला रामराम केले आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी

Mix Flip चे पुढील मॉडेल लाँच होणार नाही?

चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने दावा केला आहे की, टेक कंपनी शाओमी त्यांचा छोटा फोल्डेबल फोन म्हणजेच Mix Flip आता लाँच करणार नाही. कंपनीने आता या फोनची लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका यूजरने जेव्हा Mix Flip 3 बाबत प्रश्न विचारले तेव्हा DCS ने उत्तर देत दावा केला आहे की, कंपनी त्यांचा पुढील फ्लिप लाँच करणार नाही. मात्र रिपोर्टमध्ये अद्याप सांगितलं नाही की, कंपनी त्यांचा मोठा फोल्डेबल फोन म्हणजेच बुक स्टाइल फोल्डेबल फोन Mix Fold बंद करणार आहे की नाही. (फोटो सौजन्य – Xiaomi) 

तथापी, चिनी ब्रँड शाओमीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही किंवा याबाबत कोणतीही माहिती देखील अधिकृतपणे शेअर केली नाही. यासोबतच कंपनीने प्रोडक्ट लाईनअप बंद करण्याचा निर्णय का घेत आहे, याचे कारण देखील अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले नाही. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, छोटे फोल्डेबल फोनचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्यातून फारसे मूल्य मिळत नाही. याच कारणामुळे कंपनी ही फोन लाईनअप बंद करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

Oppo ने देखील बंद केला फ्लिप फोन?

केवळ शाओमीच नाही तर चिनी कंपनी ओप्पोने देखील त्यांची फ्लिप फोन लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Oppo Find N3 Flip नंतर त्यांचे पुढील मॉडेल लाँच केले नाही. कंपनीने हा फ्लिप फोन 2023 मध्ये लाँच केला होता. शाओमाी आणि ओप्पो त्यांची फ्लिप लाईनअप बंद करत असतानाच दुसरीकडे मोटोरोलाने अलीकडेच त्यांची नवा फ्लिप फोन लाईनअप बाजारात लाँच केली आहे. यामध्ये Motorola Razr 70, Razr 70+ और Razr 70 Ultra या डिव्हाईसचा समावेश आहे.

Web Title: Is xiaomi planning to discontinue this foldable phone lineup what will be the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • xiaomi update

संबंधित बातम्या

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
1

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
2

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
3

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
4

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.