iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी
रिपोर्ट्सवरून असा अंदाज लावला जात आहे की, आयओएस 27 मध्ये यूजर्सना एक पूर्णपणे अपग्रेडेड सिरी मिळू शकते, जी आता विजुअल अवेयरनेस देखील ऑफर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, आता तुम्ही कॅमेरा चालू करून सिरीला कोणतीही वस्तू, टेक्स्ट किंवा पॅकेजिंगबाबत माहिती विचारू शकणार आहात. यानंतर कही क्षणातच सिरी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एवढंच नाही तर फोटोज अॅपमध्ये AI बेस्ड एडिटिंग टूल्स मिळण्याची देखील शक्यता आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही फोटो एक्सपांड, रीफ्रेम आणि एन्हांस करू शकणार आहात. यासोबतच सिरीसाठी वेगळा अॅप इंटरफेस आणि मल्टीटास्किंग सपोर्ट देखील ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय थर्ड-पार्टी AI एजेंट्सचा सपोर्ट अॅप स्टोअरद्वारे जोडला जाऊ शकतो. व्हिज्युअल इंटेलिजन्सची वैशिष्ट्ये आणखी स्मार्ट होतील.
आयओएस 27 अपडेट पहिल्यांदा WWDC 2026 मध्ये सादर केले जाऊ शकते. 8 जून रोजी या अपडेटची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो सिरीज आणि नवीन आयफोन अल्ट्रा सोबत आयओएस 27 अपडेट सर्वांसाठी उपलब्ध करू शकते.
BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार






