Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Itel A300C Launch: itel ने भारतात नवीन परवडणारा 4G स्मार्टफोन ‘itel A300C’ लॉन्च केला असून त्याची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये १८W फास्ट चार्जिंगसह ६०००mAh बॅटरी, १२GB पर्यंत इफेक्टिव्ह RAM, Android 16 Go, ९०Hz रिफ्रेश रेटचा ६.५६ इंच HD+ डिस्प्ले आणि MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 22, 2026 | 05:49 PM
वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन् 100 दिवस स्क्रीन रिप्लेसमेंट; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन् 100 दिवस स्क्रीन रिप्लेसमेंट; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Follow Us
Follow Us:
  • ६०००mAh बॅटरी अन् मिलिटरी-ग्रेड दणकटपणा!
  • ‘itel A300C’ लॉन्च; किंमत १०,९९९ रुपये
  • वारंवार चार्जिंगची कटकट संपणार?
 

Itel A300C Launch: स्मार्टफोन निर्माता itel ने भारतीय बाजारात आपला नवीन itel A300C स्मार्टफोन लॉन्च केला आहे. दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेली मोठी बॅटरी, टिकाऊपणा आणि परवडणारी किंमत यावर कंपनीने या फोनमध्ये विशेष भर दिला आहे. itel A300C ची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली असून हा 4G स्मार्टफोन आहे.

६०००mAh ची दमदार बॅटरी

itel A300C चे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याची ६०००mAh क्षमतेची बॅटरी. फोनमध्ये १८W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन कामे, व्हिडिओ कॉलिंग, सोशल मीडिया आणि मनोरंजनासाठी दीर्घकाळ फोन वापरणाऱ्या ग्राहकांना वारंवार चार्जिंग करण्याची गरज कमी होऊ शकते.

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

१२GB पर्यंत इफेक्टिव्ह RAM

कामगिरीसाठी फोनमध्ये Unisoc T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यासोबत १२GB पर्यंत इफेक्टिव्ह RAM उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्मार्टफोन Android 16 Go ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

फोनमध्ये ६.५६ इंच HD+ डिस्प्ले असून तो ९०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्यामुळे WhatsApp, YouTube, सोशल मीडिया, UPI आणि QR पेमेंट तसेच शैक्षणिक ॲप्सचा दैनंदिन वापर अधिक सहज करण्यावर भर देण्यात आला आहे.

कॅमेरा आणि ऑडिओ

फोटोग्राफीसाठी itel A300C मध्ये ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. ऑडिओ अनुभवासाठी फोनमध्ये DTS-Enhanced Sound Effects देण्यात आले आहेत.

मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी

फोनच्या टिकाऊपणावरही कंपनीने विशेष भर दिला आहे. itel च्या माहितीनुसार A300C ने MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी चाचणी उत्तीर्ण केली आहे. दैनंदिन वापरातील धक्के किंवा फोन अचानक खाली पडण्यासारख्या परिस्थितींचा विचार करून त्याची रचना करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आले आहे. विशेष म्हणजे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी पहिल्या १०० दिवसांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा देत आहे.

‘UltraLink Free Call’ फीचर

नेटवर्कशी संबंधित अडचणी असलेल्या परिस्थितीत संपर्कासाठी फोनमध्ये ‘UltraLink Free Call’ हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. याशिवाय Type-C OTG कनेक्टिव्हिटी आणि इनबिल्ट इन्फ्रारेड रिमोट सेन्सरचाही सपोर्ट मिळतो. IR सेन्सरच्या मदतीने सुसंगत घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे फोनवरून नियंत्रित करता येऊ शकतात.

itel India – Transsion Holdings चे CEO अरिजित तालापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, परवडणारा फोन निवडताना ग्राहकांना कार्यक्षमतेशी तडजोड करावी लागू नये, या उद्देशाने A300C तयार करण्यात आला आहे. काम, शिक्षण, मनोरंजन आणि संपर्क अशा दैनंदिन गरजा लक्षात घेऊन मोठी बॅटरी आणि टिकाऊपणावर भर देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

१०,९९९ रुपयांच्या किमतीत itel A300C मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग, ९०Hz डिस्प्ले, Android 16 Go आणि मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी यांसारख्या वैशिष्ट्यांसह बजेट स्मार्टफोन श्रेणीत दाखल झाला आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Web Title: Itel a300c launched in india at rs 10999 with 6000mah battery android 16 go and military grade durability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • india
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
1

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
2

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.