Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
एअरटेलच्या या नव्या पोस्टपेड ऑफरिंगमध्ये ॲपलच्या नव्याने विस्तारित आयक्लाउड+ ऑफरिंग्जचा समावेश आहे. यामध्ये पर्सनल कंटेंट सुरक्षितपणे स्टोअर करणे आणि शेअर करणे, तसेच ॲपल टीव्हीवरील पुरस्कारप्राप्त ओरिजिनल्सचा ॲक्सेस आणि ॲपल आर्केडवरील शेकडो अत्यंत मनोरंजक गेम्सचा आनंद घेण्याची सुविधा मिळते. ही नवी ऑफर ₹९९९ आणि त्याहून अधिक किमतीचे फॅमिली प्लॅन्स वापरणाऱ्या एअरटेल कस्टमर्ससाठी उपलब्ध आहे.
आयक्लाउड+ मुळे एअरटेलचे लाखो पोस्टपेड कस्टमर्स त्यांच्या ॲपल डिव्हाइसेसवर फोटो, फाइल्स, पासवर्ड्स, कॉन्टॅक्ट्स आणि इतर महत्त्वाची माहिती स्टोअर, सिंक आणि ॲक्सेस करू शकतील. त्यांचा डेटा सुरक्षितपणे बॅकअपही केला जाईल. त्यामुळे नवीन डिव्हाइस सेट अप करणे अधिक सोपे होईल आणि त्यांचे डिजिटल जीवन कनेक्टेड आणि सहज ॲक्सेस करता येण्याजोगे राहील. ॲपल टीव्हीच्या माध्यमातून ॲपलच्या प्रीमियम ओरिजिनल सीरिज आणि मुव्हीजचा ॲक्सेस मिळतो, तर ॲपल आर्केडवर जाहिराती किंवा इन-ॲप पर्चेसेसशिवाय गेम्सच्या कॅटलॉगचा अनलिमिटेड ॲक्सेस मिळतो.
₹९९९ फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांच्या कुटुंबासाठी फास्टलेन टेक्नॉलॉजीसह अनलिमिटेड डेटा, स्पॅम प्रोटेक्शन आणि विविध एंटरटेनमेंट सब्स्क्रिप्शन्सचा ॲक्सेस मिळतो. ॲपलचे आयक्लाउड+, ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केड यांचा समावेश झाल्यामुळे या प्लॅनमधून आता कुटुंबांना आणखी अधिक व्हॅल्यू मिळते. कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट, गेमिंग आणि क्लाउड स्टोरेज या सर्व सुविधा एकाच पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध करून देत, कस्टमर्सना आपला पोस्टपेड प्लॅन अपग्रेड करण्यासाठी आणि त्यातून अधिक व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. कस्टमर्स एअरटेल ॲपच्या माध्यमातून किंवा कोणत्याही एअरटेल स्टोअरला भेट देऊन या प्लॅन्समध्ये सहज अपग्रेड करू शकतात.
अमित त्रिपाठी, डायरेक्टर, मार्केट ऑप्स, भारती एअरटेल, म्हणाले की, “एअरटेलमध्ये आम्ही आमच्या कस्टमर्सचे जीवन अधिक सोपे करण्यासोबतच आमच्या प्रपोजिशन्सच्या माध्यमातून त्यांना अधिक वेगळे आणि उपयुक्त व्हॅल्यू कसे देता येईल, याचा सातत्याने विचार करतो. आमचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स याच विचारसरणीवर आधारित आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाची असलेली कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि डिजिटल एक्सपीरियन्सेस एकाच प्लॅनमध्ये उपलब्ध करून देणे. आमच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफरिंगमध्ये ॲपलचे आयक्लाउड+, ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केड यांचा समावेश करून आम्ही ही प्रपोजिशन आणखी पुढे नेली आहे. यामुळे कस्टमर्सना आणखी अधिक व्हॅल्यू मिळेल आणि एअरटेलचा एक्सपीरियन्स अधिक रिवॉर्डिंग होईल.”






