
Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत... असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
‘आयटेल टफ’ फोन “रियल भारत का टफ फोन” या संकल्पनेवर आधारित आहे. हा फोन अत्यंत कष्टाची कामे करणाऱ्या, सतत फिरतीवर असणाऱ्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलची मजबूत साथ हवी असणाऱ्या लोकांसाठी टणक टिकाऊपणा आणि व्यावहारिक वैशिष्ट्ये एकत्र आणतो. शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांपासून ते आउटडोअर प्रोफेशन्स आणि साहसी उपक्रमांची आवड असणाऱ्यांपर्यंत, सर्वांना आव्हानात्मक परिस्थितीत विश्वासार्ह कामगिरी देण्यासाठी हा फोन तयार करण्यात आला आहे.
आयटेल इंडिया ट्रान्सन होल्डिंग्सचे सीईओ अरिजित तालापात्रा या प्रसंगी म्हणाले, “भारत हा असा देश आहे जिथे लाखो लोक धूळ, उष्णता, दीर्घ कामाचे तास आणि आव्हानात्मक वातावरणात काम करतात. त्यामुळे त्यांची उपकरणांची निवडही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. ‘आयटेल टफ’च्या माध्यमातून आम्ही फीचर फोन श्रेणीत टणक टिकाऊपणा आणि वास्तविक भारताला उपयुक्त ठरणारी कार्यक्षमता एकत्र आणून एक अर्थपूर्ण नावीन्य सादर करत आहोत. आमच्या ‘इनो’ मालिकेचा भाग म्हणून, ‘आयटेल टफ’ हा सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरासाठी हेतूपूर्वक, सुलभ आणि खऱ्या अर्थाने उपयुक्त तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
‘आयटेल टफ’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची मजबूत रचना, जी आउटडोअर वापरकर्त्यांना रोज भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाइन केली आहे. हा फोनआयपी५४ दर्जाच्या वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससह येतो, ज्यामुळे आव्हानात्मक वातावरणात धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून अतिरिक्त सुरक्षा मिळते. याच्या मजबूत रचनेला पूरक म्हणून मोफत डस्ट आणि शॉकप्रूफ सिलिकॉन केस दिली जात आहे, जी उपकरणाला संपूर्ण संरक्षण प्रदान करते आणि अपघाती घसरण किंवा दैनंदिन प्रभावापासून बचाव करण्यास मदत करते.
या फोनमध्ये एक शक्तिशाली ड्युअल-लॅम्प टॉर्च देखील आहे, ज्यातील दोन लॅम्प्स कमी प्रकाशाच्या स्थितीत तीव्र आणि लखलखीत प्रकाश देतात. अंधार पडल्यानंतर शेतात मार्ग काढणे असो, बाहेर काम करणे असो किंवा वीज गेल्यास सामना करणे असो, ही सुधारित टॉर्च वापरकर्त्यांना सर्वाधिक गरजेच्या वेळी उत्तम स्पष्टता देते. ‘आयटेल टफ’ केवळ टिकाऊपणापुरता मर्यादित न राहता रोजच्या व्यावहारिक गरजांनुसार तयार केलेली वैशिष्ट्ये सादर करतो.
ॲग्री बटण: भारतातील शेतकरी बांधवांसाठी या फोनमध्ये एक विशेष ‘ॲग्री बटण’ देण्यात आले आहे. याद्वारे वापरकर्ते कृषीविषयक माहिती व मदतीसाठी सरकारी हेल्पलाइनवर एका टचने कॉल करू शकतात. यामुळे विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील वापरकर्त्यांना संबंधित माहिती सहज मिळवणे शक्य होते.
किंग व्हॉइस: या फोनमध्ये ‘किंग व्हॉइस’ हे फिचर समाविष्ट आहे, जे इंग्रजी आणि हिंदी भाषेत मेसेज, मेनू आणि येणारे कॉल्स मोठ्याने वाचून दाखवते. यामुळे फोनचा दैनंदिन वापर अत्यंत सोपा आणि सुलभ होतो.
सुपर साऊंडबॉक्स: गोंगाट असलेल्या बाहेरील वातावरणात संप्रेषण आणि मनोरंजनासाठी फोनवर अवलंबून असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी, ‘आयटेल टफ’मध्ये सुपर साऊंडबॉक्स देण्यात आला आहे, जो उच्च आवाज आणि सुधारित व्हॉइस क्वालिटी प्रदान करतो.
‘आयटेल टफ’ हा आयटेलच्या नाविन्यपूर्ण ‘इनो’ मालिकेचा एक भाग आहे, ज्याची निर्मिती भारतातील ग्राहकांसाठी हेतूपूर्वक डिझाइन केलेली उपकरणे आणि अर्थपूर्ण कार्यक्षमता उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. या मालिकेने यापूर्वी ‘आयटेल ॲक्वा’ हा भारतातील एकमेव आयपी६७-रेटेड फीचर फोन सादर केला होता, ज्याद्वारे ब्रँडने या श्रेणीत मजबूत सुरक्षेवर भर दिला होता. ‘आयटेल टफ’सह ब्रँड हे पाऊल अधिक पुढे नेत रग्ड संरक्षणासोबतच आउटडोअर आणि कृषी समुदायाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली वैशिष्ट्ये एकत्र आणत आहे.