
Jio Recharge Plan: एका रिचार्जमध्ये चालणार 4 सिम! 75GB डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग... किंमत केवळ इतकी
जिओच्या या प्लॅनची किंमत 449 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 75GB पर्यंत हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर जास्तीचा इंटरनेट वापरल्यास 10 रुपये प्रति GB च्या हिशोबाने पैसे आकारले जाणार आहेत. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्लॅनमध्ये खास फॅमिली अॅड-ऑन फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. याद्वारे, यूजर्स या प्लॅनमध्ये त्यांच्या प्रायमरी कनेक्शनसह तीन एक्स्ट्रा सिम जोडू शकतात. म्हणजेच एकच प्लॅन एकूण 4 सिमकार्डमध्ये वापरला जाऊ शकतो. पण प्रत्येक एक्स्ट्रा सिम जोडण्यासाठी 150 प्रती यूजर खर्च करावे लागणार आहेत. जर तुम्ही या प्लॅनमध्ये 3 एक्स्ट्रा सिम जोडले तर 899 प्रति महिना खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक ॲड-ऑन सिमसाठी 5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. तुम्ही जोडलेल्या प्रत्येक सिम यूजरला अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, 5 जीबी अतिरिक्त मासिक डेटा आणि 300 एसएमएस मिळणार आहेत.
जिओने त्यांच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगसह मनोरंजनाची देखील काळजी घेतली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचे 3 महिन्यांचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. यामध्ये तुम्ही चित्रपट, वेब सीरीज, टीवी शो आणि लाइव स्पोर्ट्स कंटेंट पाहू शकता.
या प्लॅनमध्ये गुगल जेमिनी प्रोचे 18 महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेज देखील मिळणा आहेत. ज्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाच्या फाइल्स स्टोअर करून ठेऊ शकता.