Telegram App Banned: री-नीट परीक्षेपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्रामवर घातली बंदी... 'हे' फीचरही केलं निष्क्रिय
BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी
नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटीनंतर सरकारने आता ठोस पाऊस उचचली आहेत. कारण पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये सहसा टेलिग्राम सारख्या अॅप्सचा सर्वात जास्त वापर केला जातो. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. याच सर्व प्रकरणांचा विचार करून आता सरकारने तात्पुरत्या काळासाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पेपरफुटीसारख्या घटनामध्ये सहभागी असलेले लोकं टेलिग्राम अॅपवर लीक झालेले किंवा बनावट प्रश्नपत्रिका विकतात. टेलिग्रामवरील गोपनियता आणि मोठ्या ग्रुप आकारामुळे स्कॅमर्स आणि फसवणूक करणारे गुन्हेगार टेलिग्रामची निवड करतात. टेलिग्रामवर तयार केल्या जाणाऱ्या ग्रुप्समध्ये मेंबर्स जोडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. टेलिग्राममध्ये तयार केल्या जाणाऱ्या सामान्य ग्रुपमध्ये 200 सदस्य जोडले जाऊ शकता. जेव्हा ही मर्यादा पार होते, तेव्हा संबंधित ग्रुप आपोआप सुपरग्रुपमध्ये रूपांतरित होतो, जिथे मेंबर्स जोडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
सायबर गुन्हेगार पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये टेलिग्रामवरील गोपनियतेचा देखील फायदा घेतात. टेलिग्रामवर सीक्रेट चॅनेल्स तयार केले जाऊ शकता. सायबर गुन्हेगार टेलिग्रामवर असे सीक्रेट चॅनेल्स तयार करतात आणि जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत याची लिंक पाठवली जाते. याशिवाय, पालकांना देखील या ग्रुपमध्ये जोडले जाते.
अनेकदा पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या लोकांपर्यंत प्रश्नपत्रिका आधीच पोहोचते. यानंतर ते या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून सीक्रेट आणि वैयक्तिक ग्रुपमध्ये शेअर करतात. ग्रुपवर अपलोड करण्यात आलेले फोटो एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर अनेकजण याच प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात.
अलीकडेच, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने टेलिग्राम चॅनेलद्वारे प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या एका ऑनलाइन फसवणूक रॅकेटच्या सूत्रधाराला अटक केली. तो परीक्षेच्या एक दिवस आधी वेगवेगळे चॅनेल तयार करून 2,000-3,000 रुपयांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका लीक करत होता.






