सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री... डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज
BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी
जून महिन्याच्या अखेरीस वनप्लस एन 6 स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. वनप्लसचा हा स्मार्टफोन OnePlus N सीरीजचे भारतातील पहिले मॉडेल आहे. कंपनीने वनप्लस एन 6 चे डिझाईन शेअर करत याची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. आगामी स्मार्टफोनचे डिझाईन OnePlus Nord CE 6 प्रमाणे असणार आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये स्क्वेयर शेप रियर कॅमेरा मॉडेल दिला जाणार आहे. हा फोन दोन रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशने सुसज्ज असणार आहे. वनप्लस एन सिरीजीमधील हा नवीन स्मार्टफोन कंपनी दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करणार आहे. वनप्लस एन लाईनअपबाबत असं सांगितलं जात आहे की, ही कंपनीची एंट्री लेवल स्मार्टफोन सीरीज असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Meet the all-new #OnePlusN6
Our all-new smartphone lineup designed for India’s young and neo generation with a New, Neo, Never Off philosophy. Get notified: https://t.co/epVDSKIr94 pic.twitter.com/FGhGSTug8y — OnePlus India (@OnePlus_IN) June 15, 2026
वनप्लसने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आगामी स्मार्टफोन वनप्लस एन 6 ची लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन 30 जून रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये फ्लॅट रिअर डिझाईन दिली आहे, ज्यामध्ये स्क्वेयर शेप कॅमेरा आईलँड मिळणार आहे, जो वरील डाव्या कोपऱ्यात असणार आहे. यासोबतच फोनच्या सेंटरमध्ये वनप्लसची ब्रँडिंग देखील पाहायला मिळणार आहे.
वनप्लस आगामी स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे आहेत. फोनच्या खालील बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल, कॉलिंग माइक्रोफोन आणि सिम ट्रे दिला जाणार आहे. फोनच्या वरच्या बाजूला साइड सेकेंडरी माइक्रोफोन देखील मिळणाप आहे. वनप्लस एन 6 स्मार्टफोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले असणार आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट मिळणार आहे.
6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
कंपनीचं असं म्हणणं आहे की, वनप्लस एन सिरीजमधील भारतातील पहिले मॉडेल वनप्लस एन 6 18,000 रुपये ते 25,000 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केले जाणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या स्वस्त वनप्लस नॉर्ड फोन्सपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. वनप्लसचा हा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. काळ्या आणि हिरव्या अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हा फोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.






