दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
नवा मिवी वन 5G 4GB + 128GB, 6GB + 128GB, 8GB + 128GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूपीआय व्यवहारांवर 1,000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. स्मार्टफोनची विक्री 8 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – flipkart)
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.75 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे, ज्यामुळे स्क्रॉलिंग आणि एनिमेशन जास्त स्मूथ होणार आहे. कंपनीने फोनच्या डिझाईनमध्ये प्रिमियम अनुभव देण्यावर अधिक फोकस केला असल्याचे सांगितलं जात आहे.
दमदार परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 5G प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये एलपीडीडीआर4एक्स रॅमचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनचा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी लवर्ससाठी मिवी वन 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये सुपर कॉल फीचर देखील दिले आहे. या डिव्हाईसमध्ये प्युअर अँड्रॉईड 16 मिळणार आहे.






