Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
व्हॉट्सअॅप कॉलची क्वालिटी सर्वाधिक इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असते. जर तुमच्या स्मार्टफोनचे वायफाय कनेक्शन कमकुवत असेल किंवा मोबाईल डेटा व्यवस्थित काम करत नसेल तर व्हॉट्सअॅप कॉलची क्वालिटी खराब होऊ शकते. अशावेळी इंटरनेट बंद करून पुन्हा चालू करा. गरज पडल्यास मोबाईल डेटावरून वायफायवर किंवा वायफायवरून मोबाईल डेटावर स्विच करून कॉल करण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा अॅपचे जुने वर्जन वापरत असल्याने कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. अशावेळी गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून व्हॉट्सअॅप नव्या वर्जनवर अपडेट करा. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर पुन्हा एकदा कॉल करण्याचा प्रयत्न करा.
मोबाईलच्या मायक्रोफोन आणि स्पिकरमध्ये धुळ जमा झाली असल्यास आवाजाची क्वालिटी खराब होऊ शरकते. अशावेळी स्मार्टफोनचा स्पिकर आणि मायक्रोफोन स्वच्छ करा. स्वच्छता करताना कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका.
जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही ब्लूटूथ ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला जोडला असेल आणि कनेक्शन व्यवस्थित नसेल तर व्हॉट्सअॅप कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. अशावेळी स्मार्टफोनचे ब्लूटूथ बंद करा आणि चालू करून पुन्हा एकदा ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला कनेक्ट करा. यामुळे व्हॉट्सअॅप कॉलिंगमध्ये येणारी आवाजाची समस्या सोडवली जाऊ शकते.
वरील उपाय वापरून देखील व्हॉट्सअॅप कॉलिंगची समस्या सोडवली गेली नाही तर व्हॉट्सअॅप बंद करा आणि पुन्हा ओपन करा. यानंतर देखील समस्या येत असेल तर स्मार्टफोन रिस्टार्ट करा. कारण अनेकदा बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणाऱ्या प्रोसेसमुळे किंवा कोणत्याही सॉफ्टवेअर समस्येमुळे कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात.






