JioHotstar ने पार केला 10 करोड पेड सब्सक्राइबर्सचा आकडा, कामी आली ही स्ट्रॅटेजी; IPL ने बजावली महत्त्वाची भुमिका
नुकत्याच लाँच झालेल्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म JioHotstar ने मोठी बाजी मारली आहे. JioHotstar ने 10 करोड पेड सब्सक्राइबर्सचा आकडा पार केला आहे. खरं तर JioHotstar अलीकडेच लाँच झालं आहे आणि त्याने अगदी कमी काळात यशाचं शिखर गाठलं आहे. यासाठी JioHotstar ने काही महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीचा वापर केला आहे.
सध्याच्या प्रगतीसाठी JioHotstar ने कंटेंट ऑफरिंग्स, प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आणि एक्सेसिबिलिटी यांना महत्त्व दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा हा प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar म्हणून ओळखला जात होता, तेव्हा मे 2022 मध्ये त्याचे 50.1 मिलियन पेड सबस्क्राइबर्स होते, म्हणजेच सुमारे 3 वर्षांत 50.1 मिलियन अधिक सबस्क्राइबर्स जोडले गेले. त्याच वेळी, JioCinema आणि Disney+ Hotstar चे संयोजन, JioHotstar, गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले. या वाढत्या सबस्क्राईबर्ससाठी अनेक गोष्टींना महत्त्व दिलं जात आहे, ज्यामध्ये IPL चा देखील समावेश आहे. (फोटो सौजन्य – X)
JioHotstar टीव्ही शो, हॉलिवूड चित्रपट, विविध भाषांमधील मूळ डिजिटल कंटेट आणि रिअॅलिटी शोसह भरपूर मनोरंजन ऑफर करते. भारतीय निर्मात्यांचा समावेश असलेल्या ‘स्पार्क्स’ ने अलीकडेच लाँच केलेल्या कंटेंट पोर्टफोलिओमध्ये आणखी वैविध्य आणले आहे. ज्यामुळे येथे युजर्सना दिवसभर मनोरंजनाचा खजिना मिळतो. JioHotstar च्या ग्राहक वाढीमध्ये स्पोर्ट्स स्ट्रीमिंगनेही मोठी भूमिका बजावली आहे. या प्लॅटफॉर्मकडे आयसीसी स्पर्धा, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सारख्या प्रमुख क्रीडा स्पर्धांचे हक्क आहेत. या स्पर्धा लाईव्ह दाखवल्या जातात, ज्यामुळे अधिक युजर्स या ठिकाणी आकर्षित होत आहेत.
हे प्रीमियर लीग आणि विम्बल्डन सारख्या आंतरराष्ट्रीय खेळांचे तसेच प्रो कबड्डी आणि इंडियन सुपर लीग (ISL) सारख्या देशांतर्गत लीगचे प्रसारण करते. 4के स्ट्रीमिंग, AI-पावर्ड इनसाइट्स, रिअल-टाइम स्टॅटिस्टिक्स आणि मल्टी-अँगल व्ह्यूइंग यासारख्या वैशिष्ट्यांमुळे स्पोर्ट्स स्ट्रीमिंग अनुभव वाढला आहे. ज्यामुळे लोकांना कोणताही स्पोर्ट्स पाहण्यासठी इतर अॅप डाऊनलोड करण्याची किंवा कोणतेही सबस्क्रीप्शन खरेदी करण्याची गरज नाही.
खेळांव्यतिरिक्त, जिओहॉटस्टारने त्यांच्या लाईव्ह-स्ट्रीमिंग क्षमतांचा विस्तार केला आहे, ज्यामध्ये कोल्डप्ले म्युझिक ऑफ द स्फेयर्स कॉन्सर्ट आणि महाशिवरात्री: द डिव्हाईन नाईट ब्रॉडकास्ट सारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांचा उद्देश प्रेक्षकांना एक सामायिक सांस्कृतिक अनुभव प्रदान करणे आहे. जिओहॉटस्टारची उपलब्धता त्याच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आणि टेलीकॉम प्रोवाइडर्ससह भागीदारीमुळे सुलभ झाली आहे. प्लॅटफॉर्मचे फ्री-व्ह्यूइंग सॅम्पलिंग आणि सबस्क्रिप्शन प्राइसिंग मॉडेल्सचा उद्देश त्याची रीच वाढवणे आहे. आता JioHotstar चा हा उद्देश सत्यात उतरताना दिसत आहे.
सध्या गाठवलेल्या यशाचे शिखरावर जिओस्टारचे सीईओ-डिजिटल किरण मणी काय म्हणाले की, ‘आम्हाला नेहमीच असे वाटते की जागतिक दर्जाचे मनोरंजन प्रत्येकासाठी उपलब्ध असले पाहिजे आणि 100 दशलक्ष ग्राहकांचा आकडा ओलांडणे हे त्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. हा टप्पा केवळ भारताच्या अफाट क्षमतेचेच प्रदर्शन करत नाही तर अभूतपूर्व प्रमाणात कॅटेगरी-फर्स्ट एक्सपीरियंससाठी आमची वचनबद्धता देखील बळकट करतो.