WWDC 2025: Apple ने केली मोठ्या ईव्हेंटची घोषणा, तारखाही झाल्या जाहीर! iOS 19 सह अनेक अपडेट्सवरून अखेर पडदा उठणार
टेक कंपनी Apple ने त्यांच्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) ची घोषणा केली आहे. कंपनीने या ईव्हेंटच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. Apple ने आयोजित केलेली ही कॉन्फरन्स 9 जूनपासून सुरु होणार आहे आणि ती 13 जूनपर्यंत चालेल. म्हणजेच कंपनीचा हा ईव्हेंट 5 दिवस सुरु राहणार आहे. या ईव्हेंटवेळी अनेक नवीन प्रोडक्ट्स आणि टूल्स सादर केले जाणार आहेत. कंपनीने आयोजित केलेली ही कॉन्फरन्स ऑनलाईन स्वरूपात असणार आहे.
Lava Shark स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत 7 हजारांहून कमी; 50MP कॅमेरा आणि120Hz डिस्प्लेने सुसज्ज
रिपोर्टनुसार, Apple ने आयोजित केलेल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये iOS, iPadOS, macOS, watchOS आणि tvOS चे नवीन वर्जन आणि अनेक नवीन डेव्हलपर टूल्सचे अनावरण केले जाणार आहे. सध्या कंपनी या ईव्हेंटवर काम करत आहे. 2025 या वर्षात कंपनीने आयफोन 16 चा स्वस्त वर्जन लाँच केला आहे. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये कंपनीची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. पण या 17 सिरीजच्या लाँचपूर्वी वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर कंपनीचा यावर्षातील हा पहिला ईव्हेंट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple has officially announced #WWDC25 set to start on June 9!
Apple is expected to introduce iOS 19 at the event pic.twitter.com/GJeufrIhCs
— Apple Hub (@theapplehub) March 25, 2025
Apple दरवर्षी त्यांच्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्सचे आयोजन करते, ज्यामध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स सादर केले जातात. यावर्षी देखील हा ईव्हेंट आयोजित करण्यात आला असून तो जूनमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावेळीही हा एक ऑनलाइन कार्यक्रम असेल, जो सर्व Apple डेव्हलपर्ससाठी खुला असणार आहे. 9 जून रोजी अॅपल पार्क येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून एक मुख्य भाषण देखील होईल. ज्यामध्ये संपूर्ण ईव्हेंटचं स्वरूप सांगितलं जाण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाची घोषणा करताना, Apple ने म्हटले आहे की ते सर्व डेव्हलपर्ससाठी मोफत असेल. यामध्ये, डेव्हलपर्सना Apple तज्ञांशी बोलण्याची संधी मिळेल आणि त्यांना कंपनीच्या नवीन टूल्स, फ्रेमवर्क आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळू शकेल. या कार्यक्रमात iOS 19 ची झलक पाहता येईल. हे Apple चे आतापर्यंतचे सर्वात मोठे सॉफ्टवेअर अपडेट असल्याचे म्हटले जात आहे. यात अपडेटेड आयकॉन, मेनू आणि बटणांसह नवीन डिझाइन केलेला इंटरफेस असू शकतो. हे VisionOS द्वारे प्रेरित अपडेट असेल. सर्व अॅपल उपकरणांना समान इंटरफेस आणण्यासाठी हे अपडेट आणले जाईल.
WWDC मध्ये Apple चे लक्ष प्रामुख्याने सॉफ्टवेअरवर आहे. तथापि, कंपनी हार्डवेअरपासूनही मागे हटत नाही. 2023 च्या कार्यक्रमात, कंपनीने त्याच कार्यक्रमात व्हिजन प्रो आणि M2 ची झलक दाखवली. या वर्षीच्या घोषणांमध्ये नवीन मॅक प्रो आणि दुसऱ्या पिढीतील एअरटॅग्जचा समावेश असू शकतो. पुढील काही महिन्यांत दोन्ही प्रोडक्ट्स लाँच होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच, iOS, macOS, watchOS आणि tvOS मध्ये देखील अपडेट्स अपेक्षित आहेत. कंपनी एआय-चालित सिरीबद्दल काही माहिती देऊ शकते अशीही अटकळ आहे.