Portronics ने आपली नवीनतम LED प्रोजेक्टरच्या रेंजचा विस्तार करत Beem 500 लाँच केले आहे. यात 8K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनला सपोर्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधी कंपनीने बीम 450 लाँच केले होते. हा प्रोजेक्टर ऑगस्टमध्ये 1080p रिझोल्यूशनसह लाँच करण्यात आला होता. हा एक स्मार्ट एलईडी पोर्टेबल अँड्रॉइड प्रोजेक्टर होता. नवीन प्रोजेक्टरबद्दल डिटेल्स जाणून घेऊया.
Portronics बीम 500 स्मार्ट प्रोजेक्टर पोर्ट्रोनिक्सच्या अधिकृत वेबसाइटवर 23,999 रुपये (MRP रुपये 39,999) च्या सुरुवातीच्या किमतीत ब्लॅक आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 12 महिन्यांची वॉरंटी देखील समाविष्ट आहे. हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर देखील उपलब्ध असेल.
WhatsApp Christmas Scam: मेसेज पाठवून अकाउंट हॅक आहेत स्कमर्स, व्हॉट्सॲप युजर्ससाठी अलर्ट
Portronics Beem 500 Smart LED Projector चे स्पेसिफिकेशन्स
Beem 500, 1080p फुल एचडी नेटिव रेझोल्यूशन ऑफर करते आणि सपोर्ट मिळाल्यावर हे 8K Ultra HD पर्यंत वाढवण्याची क्षमता ठेवते. यात 6700 लुमेन LED लाइट डस्ट-फ्री, फुल-सील्ड ऑप्टिकल इंजिनमध्ये लावण्यात आला आहे. हे वाइब्रेंट आणि हाय कॉलीटी इमेज देते. 120 इंचापर्यंतच्या डिस्प्लेचा हा प्रोजेक्टर होम-थिएटरसारखा अनुभवही देतो. हे Android 9 वर चालते.
या डिव्हाइसमध्ये, युजर्स त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरून थेट कंटेंट स्ट्रीम करू शकतात आणि युजर्स याद्वारे प्री-लोडेड ओटीटी ॲप्सनाही ऍक्सेस करू शकतात. रूम फीलिंग साउंडसाठी प्रोजेक्टरमध्ये 16W स्पीकर्स आहेत. याशिवाय, यात एक्सटर्नल स्पीकर किंवा हेडफोन्ससह सहज जोडण्यासाठी वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय देखील आहे.
Instagram वर कोण करत आहे तुम्हाला Stalk? या ट्रिकने सर्व होईल उघड
यात HDMI, दोन USB पोर्ट, इथरनेट पोर्ट आणि मल्टीपल कनेक्टिव्हिटीसाठी AUX आउटपुट समाविष्ट आहे. बीम 500 त्याच्या ‘इंटेलिजेंट स्क्रीन अलाइनमेंट’ वैशिष्ट्यासह सेटअप सुलभ करते. हे वैशिष्ट्य परफेक्ट रेंक्टेंगुलर व्यू आणि शार्प फोकससाठी स्क्रीन ऑटोमॅटिक ॲडजस्ट करते. यात दिलेले स्मार्ट ऑब्सटेकल डिटेक्शन फिचर कोणतेही ऑब्सट्रक्शन दूर करण्यासाठी इमेजला ॲडजस्ट करून नॉनस्टॉप व्यूइंग निश्चित करते. प्रोजेक्टरमध्ये व्हॉइस-इनॅबल रिमोट देखील समाविष्ट आहे, जे युजर्सना थेट माइकमध्ये बोलून कंटेंट सर्च करून देते. हा प्रोजेक्टर Amlogic T972 प्रोसेसरसह येतो.