Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 5999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज

Lava Bold N1 and Bold N1 Pro: Lava कंपनीचे दोन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहे. दोन्ही स्मार्टफोन आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. स्मार्टफोन बजेट किंमतीत उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2025 | 08:51 AM
केवळ 5999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज

केवळ 5999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:

Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची विक्री जून महिन्यापासून सुरु होणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीचे बजेट व्हेरिअंट आहेत. विक्री सुरु होताच ग्राहक कंपनीची ऑफिशियल वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. शिवाय फोनच्या किंमती देखील अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कमी किंमतीत आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सची मजा ग्राहकांना मिळणार आहे.

BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Lava Bold N1 आणि Bold N1 Pro ची किंमत

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावर Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro स्मार्टफोनसाठी स्पेशल मायक्रो साइट लाईव्ह झाली आहे. या साईटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतात Lava Bold N1 ची विक्री 4 जूनपासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 5999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर प्रो व्हेरिअंट म्हणजेच Lava Bold N1 Pro स्मार्टफोनची विक्री 2 जूनपासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6699 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – X)

Lava Bold N1 स्मार्टफोन दोन रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेडिअंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आवेरी यांचा समावेश आहे. तर प्रो व्हेरिअंट स्टील्थ ब्लॅक आणि टाइटेनियम ब्लॅक या कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Lava Bold N1 चे स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंचचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाच्या या फोनमध्ये AI-पावर्ड रियर कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन IP54 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. Lava Bold N1 मध्ये ऑक्टा-कोर Unisoc प्रोसेसर असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फोनमध्ये 8 जीबी वर्चुअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर

Lava Bold N1 Pro चे स्पेसिफिकेशन

Lava Bold N1 Pro स्मार्टफोन IP54-रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. लावाच्या या फोनमध्ये Unisoc T606 SoC चिपसेट, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑफर केलं जात आहे. हा फोन 4 जीबी वर्चुअल रॅमला सपोर्ट करतो. Lava Bold N1 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

Web Title: Lava bold n1 and bold n1 pro smartphone launched in india sale starts from june month tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.