Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर
Vivo V50 Elite Edition भारतात लाँच करण्याच आलं आहे. या हँडसेटच्या खरेदीवर ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोनसोबत नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी आहे. Vivo V50 Elite Edition च्या खरेदीवर ग्राहकांना Vivo TWS 3e ईअरबड्स फ्री दिले जाणार आहेत. स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत जाणून घेऊया.
कंपनीने सांगितलं आहे की, Vivo V50 Elite Edition भारतात 12GB + 512GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलं आहे. या स्टोरेज व्हेरिअंटची भारतातील किंमत 41,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन रोज रेड कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन Amazon, Flipkart आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनसोबत फ्री दिले जाणारे Vivo TWS 3e डार्क इंडिगो शेडमध्ये उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – Vivo)
ग्राहक HDFC, SBI आणि Axis Bank कार्ड्सच्या मदतीने 3,000 रुपयांपर्यंतचा इंस्टेंट कॅशबॅक किंवा 3,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळवू शकतात. याशिवाय सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ऑप्शन्स देखील उपलब्ध आहे. ऑफलाइन ग्राहक SBI, Kotak, American Express, HSBC, DBS, IDFC First Bank, Yes Bank, Bobcard आणि Federal Bank कार्ड्सने पेमेंट केल्यास 3,000 पर्यंतचा इंस्टेंट डिस्काउंट मिळवू शकतात किंवा ग्राहक Vivo च्या V-upgrade प्रोग्राम अंतर्गत 3,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळवू शकतात.
Vivo V50 च्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 36,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर Vivo TWS 3e इयरफोन्सची कीमत 1,899 रुपये आहे.
Vivo V50 Elite Edition मध्ये 6.77-इंच फुल-HD+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक लोकल ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB LPDDR4X RAM आणि 512GB UFS 2.2 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हे Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर चालतो. स्मार्टफोनला तीन वर्षांचे OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.
फोटोग्राफीसाठी Vivo V50 Elite Edition मध्ये Zeiss-बॅक्ड डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 50-मेगापिक्सल अल्ट्रावाइड शूटर आहे. हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील आहे. यामध्ये ऑरा लाइट फीचर आहे आणि AI-बॅक्ड फोटो एडिटिंगसह दूसरे प्रोडक्टिविटी फीचर्स देखील आहेत.
Vivo V50 Elite Edition मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोन डुअल 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, OTG आणि USB 3.2 Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.
Vivo TWS 3e हे गोल्डन इअर अकॉस्टिक्स लॅबने ट्यून केले आहे आणि त्यात 11 मिमी ड्रायव्हर्स आणि कंपोझिट कश्मीरी बायोफायबर डायाफ्राम आहे. हे 30dB अडॅप्टिव एक्टिव नॉइस कँसलेशन (ANC), AI-बॅक्ड कॉल नॉइज रिडक्शन आणि 88ms लो गेमिंग लेटेंसी मोडला सपोर्ट करते. केससह हे चार्जवर 42 तासांचा प्लेटाईम देतात.