Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी कंपनीचा धमाका! 12 हजारांहून कमी किंमतीत नवा Lava फोन लाँच… तगडी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

Lava Shark 2 5G Launched: बेजट फ्रेंडली स्मार्टफोन शोधताय? अहो, मग Lava Shark 2 5G आहे ना!!! 6000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 5G सपोर्टसह लाँच करण्यात आलेल्या या फोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 11:38 AM
देशी कंपनीचा धमाका! 12 हजारांहून कमी किंमतीत नवा Lava फोन लाँच... तगडी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

देशी कंपनीचा धमाका! 12 हजारांहून कमी किंमतीत नवा Lava फोन लाँच... तगडी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Lava Shark 2 5G स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी, यूनिसोक T8200 प्रोसेसर आणि IP64 रेटिंग देण्यात आली आहे.
Lava Smartphone Launched: भारतातील स्मार्टफोन कंपनी लावाने बजेट सेगमेंटमध्ये त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन बजेट-फ्रेंडली 5G फोन Lava Shark 2 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीच्या 2025 पोर्टफोलियोमधील सर्वाधिक विक्री झालेल्या सिरीजमधील नवीन मॉडेल आता लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांहून कमी आहे. ज्या ग्राहकांना बजेट किंमतीत 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह तगडे फीचर्स पाहिजे असतील त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीने लाँच केलेल्या नव्या Lava Shark 2 5G फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Lava Shark 2 5G ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन कंपनीने 11,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 10 जून 2026 पासून लावा रिटेल नेटवर्कवर सुरु होणार आहे. लाँचवेळी ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या डिस्काऊंट ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. लावाच्या सध्याच्या ग्राहक सेवा धोरणानुसार, तुम्हाला Lava Shark 2 5G मध्ये मोफत घरपोच सेवा देखील मिळेल. (फोटो सौजन्य – Lava) 

Lava Shark 2 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Lava Shark 2 5G मध्ये 6.75-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देंण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनमध्ये 2.3GHz पर्यंत यूनिसोक T8200 6nm प्रोसेसर आणि माली-जी57 एमसी2 जीपीयू देखील दिला आहे.

प्रोसेसर

नव्या डिव्हाईसमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम, 64GB यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षा मिळावे यासाठी फोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

बॅटरी

याव्यतिरिक्त, लाँच करण्यात आलेल्या नव्या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

जे लोकं कमी किंमतीत मोठी बॅटरी आणि चांगला परफॉर्मंस ऑफर करणारा स्मार्टफोन शोधत आहेत, त्यांच्यासाठी Lava Shark 2 5G एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला असून विक्रीवेळी कंपनी या स्मार्टफोनवर काही ऑफर्स जाहिर करू शकते. ज्यामुळे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Lava कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Lava International ही भारताची स्मार्टफोन आणि मोबाईल कंपनी आहे.

  • Que: Lava चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Lava स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स आणि भारतीय ग्राहकांसाठी उपयुक्त पर्याय म्हणून ओळखले जातात.

  • Que: Lava चे 5G फोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Lava कडे अनेक बजेट 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Lava shark 2 5g launched in budget segment read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.