Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?
एसीची सर्वाधिक ऊर्जा पावर कंप्रेसर सुरु होण्यासाठी खर्च होते. जेव्हा एसी बंद केल्यानंतर पुन्हा चालू केला जातो, तेव्हा त्याचा कंप्रेसर भरपूर वीजेचा वापर करतो. जर तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने एसी चालू आणि बंद करत राहिलात तर प्रत्येकवेळी चालू केल्यानंतर एसी जास्त वीज वापरू शकतो. हेच कारण आहे की, थोड्या-थोड्या वेळाने एसी चालू आणि बंद केल्याने वीजेची बचत होत नाही तर अधिक जास्त वापर होतो, परिणामी वीजबिल देखील वाढते. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, ही समस्या नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, कारण त्यांचा कंप्रेसर प्रत्येकवेळी जास्त वीज वापरून सुरु होतो.
इन्व्हर्टर एसी थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतो. यामध्ये कंप्रेसर पूर्णपणे बंद होण्याऐवजी गरजेनुसार त्याची स्पीड अॅडजस्ट करतो. यामुळे इन्व्हर्टर एसीमध्ये वारंवार चालू आणि बंद केल्यानंतर होणारा वीज वापर कमी होतो. तसेच वीजेची देखील बचत होते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिर्घकाळ वापरानंतर इन्व्हर्टर एसी हा सामान्य नॉन इन्व्हर्टर एसी मॉडेल्सच्या तुलनेत 30 ते 50 टक्के वीजेची बचत करू शकते. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत भारतात इन्व्हर्टर एसीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
जर वीजेची बचत करायची आहे तर एसीचा वापर करण्याची योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात योग्य पद्धत म्हणजे एसीचे तापमान 24-26 डिग्री सेल्सियस दरम्यान सेट करणं. याशिवाय, स्लीप मोड, इको मोड आणि टायमर सारखे फीचर्स देखील तुम्हाला बरीच मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, एसीचा वापर करताना खोली पूर्णपणे बंद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यामुळे बाहेरिल गरम हवा खोलीमध्ये येणार नाही. खोली वारंवार गरम झाल्यास, एसी कंप्रेसरला जास्त काम करावे लागेल आणि विजेचा वापर वाढेल.






