Lava Shark स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत 7 हजारांहून कमी; 50MP कॅमेरा आणि120Hz डिस्प्लेने सुसज्ज
देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड Lava ने त्यांचा नवाकोरा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Lava Shark नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. भारतात हा स्मार्टफोन बजेट किंंमतीत लाँच केला आहे. त्याची किंमत 7 हजारांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी एक्स्ट्रा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, Lava Shark बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Lava ने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच HD+ पंच होल डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करतो.
कंपनीच्या मते, हा हँडसेट टायटॅनियम गोल्ड आणि ब्लॅक कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ते Lava रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध असेल. इतर Lava स्मार्टफोन्सप्रमाणे, Lava Shark देखील 1 वर्षाची वॉरंटीसह उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला घरपोच मोफत सेवा सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Lava Shark मध्ये 6.67-इंचाचा HD+ पंच-होल डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट देतो. याव्यतिरिक्त, डिव्हाइसला IP54 रेटिंग आहे, जे त्याचे पाणी आणि धूळीपासून संरक्षण करते. परफॉर्मेंससाठी, या नवीन स्मार्टफोनमध्ये UNISOC T60 कोर प्रोसेसर आहे, जो 4GB RAM आणि अतिरिक्त 4GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. फोनमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज आहे, जे 256GB पर्यंत वाढवता येते. हे डिव्हाइस अँड्रॉइड 14 वर चालते आणि त्यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि Face Unlock सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
🚨Lava Shark Launched in India: an iPhone Like Design Phone —
– Price – Rs 6,999
– 6.7-inch HD+ display, 120Hz refresh rate
– Unisoc T606 octa-core processor
– 5000mAh battery with 18W fast-charging#Lavashark #Lava pic.twitter.com/7mDBv3qLsy— Tanay Singh Thakur (@TanaysinghT) March 25, 2025
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सल सिंगल AI मेन कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात AI मोड, पोर्ट्रेट, प्रो मोड आणि HDR सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत भारतात 6,999 रुपये आहे. त्यामुळे हा एक बजेट स्मार्टफोन आहे.
या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल 4G VoLTE, Bluetooth 5.0, Wi-Fi 802.11 b/g/n/ac हे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे उत्पादन प्रमुख सुमित सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘Lava Shark ही एक नवीन सिरीज आहे जी सुरुवातीच्या स्तरावर ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. हे आमच्या 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीतील उत्पादन धोरणाचा एक भाग आहे. आम्ही येत्या काही महिन्यांत अधिक नाविन्यपूर्ण ऑफरसह शार्क मालिकेचा विस्तार करणार आहोत.