Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके
मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
नुकत्याच समोर आलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये स्मार्टफोन कंपनीने सांगितलं आहे की, भारतात लवकरच Wobble Speed 5G लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा हँडसेट देशात एक रेड शेडमध्ये लाँच केला जाणार आहे. तसेच कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचे डिझाईन देखील जगासमोर सादर केले आहे. फोनमध्ये एक फ्लॅट रियर पॅनल मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे, ज्यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशचाही समावेश असेल. (फोटो सौजन्य: X)
Wobble Speed 5G च्या उजव्या बाजूला पावर बटन दिले आहे. वॉल्यूम कंट्रोल बटन देखील पावर बटनच्या वरच्या बाजूला दिसत आहे. तर डिव्हाईसच्या डाव्या बाजूला कोणतेही बटन नसतील. चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी आगामी Wobble Speed 5G च्या खालील बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे. तर आगामी स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, उपलब्धता आणि लाँच डेटबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.
लवकरच लाँच केला जाणारा Wobble Speed 5G ब्रँडच्या आधीच लाँच करण्यात आलेल्या Wobble One 5G लाईनअपमध्ये समाविष्ट होणार आहे. Wobble One 5G गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या बेस व्हेरिअंटची किंमत 22,000 रुपयांपासून सुरु होते. हा स्मार्टफोन 8GB+256GB आणि 12GB+256GB या दोन व्हेरिअंट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता.
गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Wobble One 5G मध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेल्या ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेटवर चालतो, जो 2.6GHz ची पीक क्लॉक स्पीड देतो. या हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट मिळणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
Ans: Wobble Speed 5G लवकरच भारतात लॉन्च होणार असल्याची कंपनीने घोषणा केली आहे. मात्र, लॉन्चची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
Ans: हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश मिळणार आहे.






